Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून टाइप २ डायबेटिससाठीचे भारताचे पहिले डीसीजीआय मान्यताप्राप्त सेमाग्लुटाइड इन्जेक्शन...

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून टाइप २ डायबेटिससाठीचे भारताचे पहिले डीसीजीआय मान्यताप्राप्त सेमाग्लुटाइड इन्जेक्शन ‘ओबेडा®’ बाजारात दाखल केल्याची घोषणा

 

या घोषणेद्वारे डॉ. रेड्डीजने GLP1 रिसेप्टर अॅगॉनिस्ट्स थेरपीच्या क्षेत्रात पदार्पणाचा पहिला दिवस व भारतातील रुग्णांना सेवा पुरविण्यासाठीची सुसज्जता प्रस्थापित केली.

३१२ सहभागींची नोंदणी करून घेत हाती घेतलेल्या तिसऱ्या टप्प्यातील हेड-टू-हेड क्लिनिकल पाहणीतून डॉ. रेड्डीजच्या ओबेडा® ने या नाविन्यपूर्ण औषधाची इतर इनोव्हेटर ड्रगच्या तुलनेत सारखीच परिणामकारकता व सारख्याच स्वरूपाची सुरक्षितता दाखवून दिली.

डॉ. रेड्डीज ओबेडा® सेमाग्लुटाइड इन्जेक्शन २ mg व ४ mg क्षमतेमध्ये उपलब्ध आहे व सबक्युटेनस, आठवड्यातून एकदा घ्यावयाच्या वापरायला सुलभ अशा प्री-फील्ड, डिस्पोजेबल पेन डिव्हाइसच्या रूपात ते मिळेल.

दोन्ही क्षमतांगटातील प्रत्येक पेन किमान ४ वीकली डोस पुरवेल. रुग्णासाठी याची किंमत दोन्ही क्षमतांसाठी मासिक रु. ४,२०० इतकी असेल.

बाजारपेठेतील पहिल्या टप्प्यातील पदार्पणाचा भाग म्हणून नियामक संस्थांची मान्यता मिळाल्यास अनेक देशांमध्ये जेनेरिक सेमाग्लुटाइड उपलब्ध करून देण्याचे डॉ. रेड्डीजचे लक्ष्य आहे.

डायबेटिस व लठ्ठपणासह चयापचयाशी संबंधित अनेक आजारांसाठी कंपनीद्वारे संपूर्ण आवाका असलेला GLP-1 पोर्टफोलिओ उभारला जात असताना या औषधाला दिले गेलेले ओबेडा® हे ब्रॅंडनेम कंपनीकडून याच एकात्मिक उपचारात्मक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित असल्याचे निदर्शित करते.

हैदराबाद, भारत, २१ मार्च २०२६ – जागतिक स्तरावर कार्यरत फार्मास्युटिकल कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लि. (BSE : 500124 NSE : DRREDDY, NYSE :RDY, NSEIFSC : DRREDDY; व त्यासह तिच्या उपकंपन्यांचा उल्लेख एकत्रितपणे डॉ. रेड्डीज असा केला जातो)ने आज ओबेडा® या ब्रॅँडनेमसह आपले इन्जेक्टेबल सेमाग्लुटाइड बाजारात दाखल केल्याची घोषणा केली व भारतातील टाइप २ डायबेटिसच्या व्यवस्थापनासाठी प्रगत GLP-1 रिसेप्टर अॅगॉनिस्ट-बेस्ड थेरपीची उपलब्धता विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले. जेनेरिक सेमाग्लुटाइडसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ची संमती मिळविणारी ड़ॉ. रेड्डीज ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. या पदार्पणामुळे कंपनीचा या क्षेत्रातील पेन्टन्ट कालबाह्य झाल्यानंतरच्या प्रवेशाचा हा पहिला दिवस ठरला असून त्यातून भारतातील रुग्णांच्या अपूर्ण राहिलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीची सुसज्जता दिसून आली आहे.

भारतावर डायबेटिस रुग्णांचा जगातील सर्वात मोठा भार आहे व ICMR-INDIAB च्या आकडेवारीनुसार १०१ दशलक्ष प्रौढ व्यक्ती या आजारासह जगत आहेत. या पाहणीच्या अंदाजानुसार या रोगाचा प्रादुर्भाव ११.४ टक्‍के इतका असून प्रत्येक दहा प्रौढ व्यक्तींपैकी जवळजवळ चार व्यक्ती पोटाच्या स्थूलतेचा सामना करत आहेत. याखेरीज आणखी १३६ दशलक्ष व्यक्ती प्री-डायबेटिक स्थितीमध्ये आहेत व त्यांना हा आजार होण्याचा धोका अत्यंत जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसमावेशक उपचारांचा भाग म्हणून GLP-1 रिसेप्टर अॅगोनिस्ट असलेल्या सेमाग्लुटाइडचा वापर झाल्यास साखरेवरील नियंत्रणात सुधारणा आणण्याच्या व वजनाच्या व्यवस्थापनाला मदत करण्याच्या बाबतीत जगभरात आतापर्यंत चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले आहे.

३१२ सहभागींची नोंदणी असलेल्या हेड-टू-हेड स्वरूपाच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल स्टडीमध्ये डॉ. रेड्डीज ओबेडा® ने नॉन-इन्फिरियर अर्थात इनोव्हेटर ड्रगच्या दर्जाची परिणामकारकता दाखवली व इनोव्हेटर ड्रगशी तुलना करण्याजोगी सुरक्षितता दर्शवली. या औषधामुळे सारख्याच प्रकारचे ग्लायसेमिक रिडक्शन झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर या अभ्यासाअंती फास्टिंग ग्लुकोज नियंत्रण, पोस्ट-प्रॅडिनल ग्लुकोज नियंत्रण आणि उपचारात्मक ग्लायसेमिक प्रतिसाद (HbA1c<7.0% इतका परिणाम साध्य झाला) यांच्यासाठीही तुलनायोग्य परिणाम दिसून आले. कोणत्याही औषधविरोधी अँटिबॉडीज दिसून आल्या नाहीत व औषधाचे इम्युनोजेनिसिटी प्रोफाइल इनोव्हेटर ड्रगसारखेच असल्याचे आढळले.

API चा विकास आणि उत्पादन, तसेच फॉर्म्युलेशन विकसित करणे या सर्व गोष्टी संपूर्णपणे कंपनीमध्येच करण्यात आल्याने ओबेडा® मध्ये डॉ. रेड्डीजची जटिल उत्पादन विकासाची तसेच पेप्टाइड सायन्समधली ताकद प्रतिबिंबित होते. तसेच यातून कंपनीची पेप्टाइट तंत्रज्ञानातील दशकभराची अनुभवसिद्धता आणि उच्च दर्जाच्या, परवडणाऱ्या दरांतील औषधे बाजारात सहज उपलब्ध व्हावीत याची खातरजमा करण्यासाठी व भारताच्या बदलत्या आरोग्य गरजा पुरविण्यासाठी GLP-1 थेरपी उपलब्ध करून देण्याप्रती कंपनीची कटिबद्धताही दिसून येते. GLP-1 थेरपींसाठीच्या आपल्या भविष्यकालीन योजनांचा भाग म्हणून कंपनीकडून संपूर्णतया एकात्मिक API व फॉर्म्युलेशन कार्यपद्धती स्वीकारण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्यात विकास व उत्पादन या दोन्ही गोष्टी कंपनीमध्येच साधल्या जातील.

ड़ॉ. रेड्डीजचे चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर एरेझ इस्त्राएली म्हणाले: “आजच्या या पदार्पणाच्या निमित्ताने भारत व संपूर्ण जगभरातील रुग्णांसाठी वैशिष्टपूर्ण उपाययोजनांच्या साथीने महत्त्वाच्या उपचारात्मक क्षेत्रांत आपला पोर्टफोलिओ विस्तारण्याप्रती आमची कटिबद्धता जपण्याच्या दिशेने एक लक्षणीय पाऊल उचलले गेले आहे. GLP-1 थेरपीजच्या क्षेत्रातील आमचा प्रवेश जटिल उत्पादन विकासाच्या व पेप्टाइट सायन्समधील आमच्या क्षमतांना प्रतिबिंबित करतो. नवसंकल्पना आणि उपलब्धता यांना एकत्र आणत, प्रगत टप्प्यावर पोहोचलेल्या डायबेटिसवरील उपचार केवळ उपलब्धच नव्हे तर परवडण्याजोगाही असावा याची खातरजमा करत आरोग्यसेवा क्षेत्रातील एक विश्वासार्ह भागीदार बनविण्याचे आमचे ध्येयधोरण यामुळे पुन:प्रस्थापित झाले आहे. पहिल्या टप्प्यातील पदार्पणाचा भाग म्हणून अनेक देशांमध्ये जेनेरिक सेमाग्लुटाइड उपलब्ध करण्याचे आमचे लक्ष्य आहे व आमच्या ‘वन प्रोडक्ट, वन क्वालिटी’ दृष्टिकोनाच्या माध्यमातून सर्व बाजारपेठामध्ये सारख्याच उच्च दर्जाचे उत्पादन पुरविले जाईल, याची काळजी घेण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत.”

डॉ. रेड्डीजच्या ब्रॅण्डेड मार्केट (इंडिया अँड इमर्जिंग मार्केट्स) विभागाचे चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर एम. व्ही. रामाना म्हणाले: देशातील पहिले मान्यताप्राप्त जेनेरिक सेमाग्लुटाइड म्हणून, आजची घोषणा ही आमच्या विज्ञानाधारित दृष्टिकोनाला व भारतात प्रगत उपचारांची उपलब्धता विस्तारण्यासाठीच्या आमच्या दीर्घकालीन प्रयत्नांना प्रतिबिंबित करणारी आहे. देशावर डायबेटिसचा भार वाढत असताना, उपचारांचे परिणामकारक पर्याय पुरविण्याचे आणि अधिकाधिक रुग्णांना जागतिक स्तरावर प्रस्थापित उपचारांचा लाभ घेण्यास सक्षम बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. या महत्त्वाच्या औषधाच्या बाजारातील पदार्पणामुळे आमचा डायबेटिसवरील औषधांचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत झाला आहे आणि चयापचयाशी संबंधित दीर्घकालीन आजारांसोबत जगणाऱ्या लोकांच्या दीर्घकालीन आरोग्य परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणण्याप्रतीची आमची दीर्घकालीन कटिबद्धता यातून पुन्हा प्रस्थापित झाली आहे. GLP-1 थेरपीज आमच्यासाठी लक्ष केंद्रित करण्याच्या एका महत्त्वाच्या भागाचे प्रतिनिधीत्व करतात, आणि सर्व स्वरूपांमध्ये मल्टिपल मेटॅबॉलिक इंडिकेशन्ससाठी संपूर्ण आवाका असलेला पोर्टफोलिओ उभारण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करत राहू.”

डॉ. रेड्डीज ओबेडा® इन्जेक्शन २ mg आणि ४ mg च्या क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत व ती सबक्युटेनस, आठवड्यातून एकदा घेण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेल्या प्री-फील्ड, डिस्पोझेबल पेनच्या स्वरूपात मिळतात, ज्यांच्यासाठी संपूर्ण वितरण साखळीमध्ये कणखर कोल्ड-चेन एकात्मता जपण्यात आली आहे. दोन्ही क्षमतांमधील प्रत्येक पेन किमान ४ वीकली डोसेस देतात. दोन्ही क्षमतांसाठी रुग्णांना प्रति महिना रु. ४,२०० इतका खर्च होईल. त्याचबरोबर, ४१ जणांचा सहभाग असलेल्या सुमारे २० महत्त्वाची कार्ये पूर्ण करणाऱ्या, USFDA च्या औषध उपकरण स्वरूपातील कॉम्बिनेशन उत्पादनांसाठीच्या मार्गदर्शक तत्वांशी मेळ साधणाऱ्या एका मानवी-घटक पाहणीमध्ये ओबेडा® पेनने इनोव्हेटर पेनच्या तुलनेत नॉन-इन्फिरिअर यूजर-परफॉर्मन्स परिणाम दाखवून दिले.

ओबेडा® साठीच्या आपल्या पेशंट सपोर्ट कार्यक्रमाचा एक भाग म्हणून डॉ. रेड्डीजने रुग्णाच्या औषधाबरोबरच्या वाटचालीच्या शिस्तबद्धतेत वाढ करण्यासाठी SemaKare™ ही सर्वसमावेशक आधार यंत्रणा विकसित केली आहे. डिजिटल अॅपचा आधार असलेले SemaKare™ या उत्पादनाचा प्रथम वापर करताना अर्थात ऑनबोर्डिंगसाठीचे मार्गदर्शन पुरविते तसेच फील्ड डीव्हाइस-काउन्सिलरचे सहाय्य, इंजेक्शन घ्यावयाचे प्रशिक्षण, टेलि-सपोर्ट, थेरपी नियमितपणे घेतली जात आहे किंवा नाही यावरील देखरेख अशा अनेक गोष्टी पुरविते, जेणेकरून रुग्णाला उपचारांच्या मिळणाऱ्या परिणामांमध्ये सुधारणा व्हावी.

यापुढील टप्प्यात भारतभरात मेटॅबॉलिक सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करून एक एकात्मिक देखभाल परिसंस्था उभारण्याचे डॉ. रेड्डीजचे लक्ष्य आहे. ही सेंटर्स आरोग्यसेवाक्षेत्रातील व्यावसायिकांच्या (HCP) शिक्षणावर, पुराव्यांवर आधारित व्यवस्थापनावर आणि प्रत्यक्ष जगातील पुरावे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत डायबेटिस व चयापचयाशी संबंधित इतर आजारांवरील उपचारांमध्ये प्रगती घडवून आणणारी एकात्मिक केंद्रे म्हणून काम करतील. या उपक्रमामुळे निदानात्मक क्षमता व पायाभूत यंत्रणा अधिक प्रबळ होण्यास मदत होईल, व त्याचवेळी संरचित प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून सहाय्यक कर्मचारीवर्गाची कौशल्य उभारणी होईल. त्याचबरोबर ही केंद्रे रुग्णामध्ये जागरुकतेस चालना देतील व सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतील. प्रत्येक व्यक्तीला आपल्या उपचारांची वाटचाल संपूर्ण माहितीनिशी पार पाडता यावी व त्यात त्यांचा संपूर्ण सहभाग असावा याची खातरजमा या प्रयत्नांद्वारे केली जाईल. त्याचबरोबर वापरलेली पेन्सची शाश्वत पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी या केंद्रांमध्ये एक स्वतंत्र ड्रॉप-बॉक्स असेल. तसेच डॉ. रेड्डीज नेस्ले हेल्थ सायन्स या आपल्या संयुक्त उद्योगाद्वारे निर्मित Celevida GLP+, Optifast यांसह अन्य महत्त्वाच्या उत्पादनांचा लाभ घेत GLP-1/GIP थेरपीज घेणाऱ्या रुग्णांच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करण्याचेही डॉ. रेड्डीजचे लक्ष्य आहे. ही उत्पादने पोषक घटकांच्या अधिक चांगल्या ग्रहणाला आधार देतात व मसल मास जपण्यास मदत करतात आणि चयापचय यंत्रणेचे तसेच शरीरकार्यांचे आरोग्य जपण्यासाठी अत्यावश्यक असलेले टार्गेटेड न्यूट्रिशन देऊ करतात.

डॉ. रेड्डीजचे ओबेडा® हे एक प्रिस्क्रिप्शनवर घेता येणारे औषध आहे. अधिक तपशीलासाठी रुग्णांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

……………………………………………………………………………

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments