Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोटक महिंद्रा बँकेने बँकिंगमधील करिअरसाठी गेटवे - कोटक नेक्‍स्‍टजेन बँकर्स प्रोग्राम लाँच...

कोटक महिंद्रा बँकेने बँकिंगमधील करिअरसाठी गेटवे – कोटक नेक्‍स्‍टजेन बँकर्स प्रोग्राम लाँच करण्‍यासाठी मणिपाल अकॅडमी ऑफ बीएफएसआय सोबत सहयोग केला हा सहयोग पीजी डिप्‍लोमा कोर्स इन रिलेशनशिप बँकिंग ऑफर करणार

मुंबई, 11 मार्च २०२४ – कोटक महिंद्रा बँकेने (‘केएमबीएल’ / ‘कोटक’) बँकिंग उद्योगाच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍याच्‍या उद्देशाने उद्योग-सुसज्‍ज टॅलेंटला कुशल करण्‍यासह विकसित करण्‍याकरिता कोटक नेक्‍स्‍टजेन बँकर्स प्रोग्राम लाँच करण्‍यासाठी मणिपाल अकॅडमी ऑफ बीएफएसआयसोबत सहयोग केला आहे. १२ महिन्‍यांचा पोस्‍ट ग्रॅज्‍युएट डिप्‍लोमा इन रिलेशनशिप मॅनेजमेंट बँकिंग इच्‍छुकांना ग्राहक अनुभवाचे प्रशिक्षण देईल आणि कोर्स पूर्ण झाल्‍यानंतर कोटक महिंद्रा बँक लि. येथे शाखा संबंध व्‍यवस्‍थापक (उप व्‍यवस्‍थापक) म्हणून हमीपूर्ण* रोजगार देईल.

बदलत्‍या बँकिंग व आर्थिक स्थितीने ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजा व पसंतींची पूर्तता करणाऱ्या टॅलेंटसाठी अधिक मागणी निर्माण केली आहे. कोटक नेक्‍स्‍टजेन बँकर्स प्रोग्राम बँकिंग उद्योगाच्‍या गरजांची पूर्तता करेल आणि बँकेला उत्‍साहवर्धक ग्राहक-केंद्रित सेवा देण्‍यामध्‍ये साह्य देखील करेल. बँकेमधील बँकिंग तज्ञ व प्रमुखांकडून देण्‍यात येणारे सर्वसमावेशक क्‍लासरूम व ऑन-द-जॉब प्रशिक्षण कोटक महिंद्रा बँकेच्‍या संस्‍कृतीमध्‍ये, तसेच उद्योग-मान्‍यताकृत प्रक्रियांमध्‍ये टॅलेंटला विकसित करेल.

कोटक महिंद्रा बँक लि.च्‍या कंझ्युमर बँकेचे ग्रुप अध्‍यक्ष व प्रमुख विराट दिवाणजी म्‍हणाले, ”आम्‍हाला टॅलेंटला निपुण करण्‍यासह बँकिंग उद्योगासाठी आधुनिक संबंध व्‍यवस्‍थापक तयार करण्‍याकरिता मणिपाल अकॅडमी ऑफ बीएफएसआयसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. कोटक महिंद्रा नेक्‍स्‍टजेन बँकर्स प्रोग्राम महत्त्वाकांक्षी तरूणांसाठी योग्‍य लाँच पॅड आहे, जो त्‍यांना त्‍यांच्‍या बँकिंग करिअरमधील विकास व यशासाठी कौशल्‍यांसह सुसज्‍ज करतो.”

मणिपाल अकॅडमी ऑफ बीएफएसआयचे चीफ बिझनेस ऑफिसर रॉबिन भौमिक म्‍हणाले, ”आम्‍हाला नेक्‍स्‍टजेन बँकर्स प्रोग्राम लाँच करण्‍यासाठी कोटक महिंद्रा बँकेसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही आर्थिक सेवांमधील पदांसाठी प्रशिक्षण देण्‍याकरिता मणिपाल अकॅडमी ऑफ बीएफएसआयच्‍या संपन्‍न उद्योग अनुभवाचा फायदा घेण्‍यास उत्‍सुक आहोत. हा प्रोग्राम प्रबळ ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासह टेक्निकल व सॉफ्ट स्किल्‍स प्रशिक्षण देईल. आमचा बँकर्सची भावी पिढी घडवण्‍याचा मनसुबा आहे, जे बँकेच्‍या यशाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतील.”

कोटक नेक्‍स्‍टजेन बँकर्स प्रोग्राममध्‍ये मणिपाल अकॅडमी ऑफ बीएफएसआयच्‍या बेंगळुरू कॅम्‍पस् येथे ४ महिन्‍यांचे निवासी क्‍लासरूम प्रशिक्षण, त्‍यानंतर २ महिन्‍यांचे ऑन-द-जॉब ट्रेनिंग (ओजेटी) यांचा समावेश असून भारतातील नियुक्‍त केलेल्‍या कोटक महिंद्रा बँकेच्‍या शाखा/कार्यालयामध्‍ये ६ महिन्‍यांच्‍या इंटर्नशिपसह या प्रोग्रामची सांगता होते. अभ्‍यासक्रमामध्‍ये मणिपाल अकॅडमी ऑफ बीएफएसआयचे प्राध्‍यापकवर्ग, तसेच उद्योगामधील प्रमुखांकडून प्रमुख बँकिंग संकल्‍पनांचे ज्ञान दिले जाते, रिलेशनशिप मॅनेजमेंटच्‍या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन दिले जाते आणि नियुक्‍त केलेले प्रकल्‍प व लक्ष्‍यांच्‍या माध्‍यमातून वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते. कोटक महिंद्रा बँक प्रोग्रामचे शिक्षण घेण्‍याच्‍या तीन टप्‍प्‍यांदरम्‍यान शिष्‍यवृत्ती, तसेच हमीपूर्ण** बोनसच्‍या माध्‍यमातून आर्थिक साह्य प्रदान करेल.

कोटक नेक्‍स्‍टजेन बँकर्स प्रोग्रामची पहिली बॅच मार्च २०२४ पासून सुरू होईल. नोंदणी करण्‍यासाठी आणि नेक्‍स्‍टजेन बँकर्स प्रोग्रामबाबत अधिक माहितीसाठी कृपया लिंकला फॉलो करा: https://www.kotak.com/en/about-us/careers/nextgen.html

पात्रता व निवड प्रक्रिया:

या प्रोग्रामकरिता पात्र ठरण्‍यासाठी:

· अर्जदाराने कोणत्‍याही शाखेमधून बॅचलर्स/पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे.

· अर्जदार पदवी/पदव्‍युत्तर पदवीच्‍या अंतिम वर्षात असण्‍यासोबत परीक्षा दिलेली असेल आणि निकालाची वाट पाहत असतील तर ते प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात. पण, अंतिम वर्षाची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रवेश तारखेपूर्वी उपलब्‍ध करून दिले पाहिजे.

· महत्त्वाकांक्षी बँकरचे वय प्रोग्रामसाठी नोंदणीच्‍या वेळी २७ वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे.

· बी.एससी./बी.ई./बी.टेक साठी ग्रॅज्‍युएशन पदवीमध्‍ये ६० टक्‍क्‍यांहून अधिक गुण आवश्‍यक आहेत.

· इतर सर्व स्‍पेशलायझेशन्‍ससाठी ग्रॅज्‍युएशन पदवीमध्‍ये ५० टक्‍क्‍यांहून अधिक गुण आवश्‍यक आहेत.

निवड प्रक्रिया

· https://www.kotak.com/en/about-us/careers/nextgen.html या लिंकच्‍या माध्‍यमातून वेबसाइटवर नोंदणी.

o नोंदणीनंतर प्रोग्राममध्‍ये निवड होण्‍यासाठी मूल्‍यांकन व एक मुलाखत घेण्‍यात येईल.

o मूल्‍यांकनामध्‍ये अॅप्टिट्यूड टेस्‍ट (अभियोग्‍यता चाचणी) आणि कॉग्निटिव्‍ह टेस्‍ट (संज्ञानात्‍मक चाचणी) यांचा समावेश असेल.

· पॅनेल मूल्‍यांकनामध्‍ये यशस्‍वी ठरलेल्‍या उमेदवारांची मुलाखत घेईल.

· मूल्‍यांकन व मुलाखतीसाठी तारखा उमेदवारांना आगाऊ कळविण्‍यात येतील.

*प्रोग्रामचे तिन्‍ही टप्‍पे यशस्‍वीरित्‍या पूर्ण करणारे उमेदवार हमीपूर्ण रोजगारास पात्र ठरतील.

**१२ महिने व २४ महिने नोकरी यशस्‍वीरित्‍या केल्‍यानंतर दोन टप्‍प्‍यांमध्‍ये १.५ लाख रूपयांचा हमीपूर्ण बोनस देण्‍यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments