Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedशहीद दिनानिमित्त थोर क्रांतिकारकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अभिवादन....

शहीद दिनानिमित्त थोर क्रांतिकारकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अभिवादन….

शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी – महापौर रवि लांडगे

 

पिंपरी, दि. २३ मार्च २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहीद दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

 

यावेळी महापौर रवि लांडगे यांनी “शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे देशासाठीचे बलिदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्याग, धैर्य आणि देशप्रेमाच्या भावनेतून प्रेरणा घेऊन समाज व देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे सांगून तरुण पिढीने या थोर क्रांतिकारकांच्या विचारांचा व प्रखर देशभक्तीचा आदर्श घेवून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन त्यांनी केले.

 

दापोडी येथे शहीद भगतसिंग यांना अभिवादन…

 

शहीद दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने दापोडी येथील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

या प्रसंगी शहर सुधारणा समितीचे सभापती संजय उर्फ नाना काटे, नगरसदस्य राजू बनसोडे, नगरसदस्या स्वाती माई काटे, प्रतिक्षा लांघी जवळकर यांच्यासह महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागांचे कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थि

त होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments