Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वातंत्र्य संग्रामावर आधारित राजगुरूनगर येथे भव्य प्रदर्शननाचे आयोजन*

स्वातंत्र्य संग्रामावर आधारित राजगुरूनगर येथे भव्य प्रदर्शननाचे आयोजन*

 

 

पुणे, दि.२३: सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राजगुरुनगर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वंदेमातरम सार्ध शताब्दी १५० वर्षानिमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारक हुतात्मा शिवराम, हरी राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा भगतसिंग यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वातंत्र्य संग्रामावर आधारित भव्य प्रदर्शनाचे २४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत शालीमार पॅलेस, चांडोली, राजगुरुनगर, ता. खेड येथे आयोजन करण्यात आले आहे.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते करण्यात येणार आहे. या प्रसंगी राज्य व मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहे.

 

या प्रदर्शनात स्वातंत्र्यलढ्यातील दुर्मिळ छायाचित्रे, माहिती फलक आणि स्थानिक कलाकारांचे देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, असे राजगुरुनगरचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments