वाहन चालवण्याताना गतिशीलता आणि सुरक्षितता या क्षेत्रांतील अग्रणीने, आपल्या ग्राहकांसाठी उत्पादनांची श्रेणी खऱ्या अर्थाने सर्वांसाठी सुलभ करून, भारतीय बाजारपेठेत नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत.
मालकीचा मान आणि मूल्य: अगदी नवीन पुढील आणि मागील डिझाइन, संपूर्ण श्रेणीमध्ये उपलब्ध असलेले अस्सल टर्बो-चार्ज्ड ऑटोमॅटिक पर्याय, तसेच LED हेडलाईट्स व टेललाईट्स, सिक्वेन्शियल रेअर टर्न इंडिकेटर्स, अलॉय व्हील्स, इलेक्ट्रिक सनरूफ, क्लायमेट्रॉनिक ऑटो AC, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि Škoda Super Care यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आला आहे.
तडजोड न करणारी सुरक्षितता: Global NCAP कडून 5-स्टार सुरक्षा मानांकन आणि 40 हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज; आता रेन-सेन्सिंग वायपर्स, रेअर वायपर व डिफॉगर आणि ऑटो IRVMs यांसारख्या सुविधांचाही स्टँडर्ड स्वरूपात समावेश करण्यात आला आहे.
सुसज्ज एन्ट्री-लेव्हल व्हेरिएंट म्हणून, नवीन Kushaq Classic+ ने अपेक्षांचे मापदंडच बदलून टाकले आहेत
या श्रेणीत सर्वोत्तम असलेले ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, या सेगमेंटमध्ये प्रथमच उपलब्ध होणाऱ्या आणि अगदी मूळ व्हेरियंटपासूनच मिळणाऱ्या आठ-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकमुळे आणखी एका उच्च स्तरावर गेली आहे
प्रसिद्ध आराम, विभागातील सेगमेंटमध्ये प्रथमच उपलब्ध होणाऱ्या रेअर सीट मसाजर ने समृद्ध
नवीन Kushaq 1.0 TSI श्रेणीची सुरुवात ₹ 10,69,000 पासून होते
श्रेणीतील सर्वोच्च मॉडेल्स असलेल्या 1.5 TSI Prestige आणि Monte Carlo या गाड्या, आता ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 26.03 सेमीचे व्हर्च्युअल कॉकपिट आणि अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अधिकच आकर्षक बनल्या आहेत
कामगिरीच्या शौकिनांना लक्ष्य करणारी, अत्यंत नावाजलेली सात-स्पीड DSG गिअरबॉक्स असलेली नवीन Kushaq 1.5 TSI, ₹ 18,79,000 पासून उपलब्ध आहे
‘You Never Drive Alone’ हे वचन 183+ शहरांमधील 325 टचपॉइंट्सद्वारे पूर्ण करण्यात आले.
मुंबई, 21 मार्च 2026 – Škoda Auto India ने, अद्ययावत आणि सुधारित नवीन Kushaq च्या किमती आणि ग्राहकांना वाहनांची डिलिव्हरी देण्याची सुरुवात हे जाहीर केले आहे. या वर्षी जानेवारीत अनावरण करण्यात आलेली नवीन Kushaq मूल्य, सुरक्षा आणि ड्रायव्हिंग डायनॅमिक्सच्या बाबतीत नवे मापदंड प्रस्थापित करते; तसेच, आपल्या संपूर्ण श्रेणीमध्ये युरोपियन तंत्रज्ञान सर्वांसाठी सुलभ करण्याच्या ब्रँडच्या धोरणाला ती अधिक पुढे नेते. अगदी नवीन आठ-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि रेअर सीट मसाजर यांसारख्या आपल्या श्रेणीतील सर्वप्रथम तंत्रज्ञान तसेच अनेक नवीन वैशिष्ट्ये आणि प्रमाणित उपकरणांनी सज्ज असलेल्या, नवीन Kushaq 1.0 TSI आणि नवीन Kushaq 1.5 TSI या दोन्ही गाड्या Škoda Auto India च्या युरोपियन अभियांत्रिकी आणि 5-स्टार सुरक्षा भारतीय रस्त्यांवर अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या धोरणाचे अनुसरण करतात. नवीन Kushaq पाच ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे: Classic+, Signature, Sportline, Prestige आणि Monte Carlo हे मॉडेल्स टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनांचे पर्याय उपलब्ध करून देतात जे मॅन्युअल आणि रिअल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडलेले आहेत. ग्राहकांसाठी आठ रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत – कँडी व्हाईट, कार्बन स्टील, ब्रिलियंट सिल्व्हर, लावा ब्लू आणि डीप ब्लॅक – ज्यामध्ये तीन पूर्णपणे नवीन रंगांचा समावेश आहे: शिमला ग्रीन, स्टील ग्रे आणि चेरी रेड.
Škoda Auto India चे ब्रँड संचालक आशिष गुप्ता, म्हणाले, “Škoda Auto India मध्ये, युरोपियन तंत्रज्ञान सर्वांसाठी सुलभ करणे आणि ते ग्राहकांच्या एका व्यापक वर्गापर्यंत पोहोचवणे, यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. नवीन Kushaq मधून, आम्ही संपूर्ण श्रेणीमध्ये मूल्यांची खऱ्या अर्थाने पुनर्व्याख्या करतो. नवीन Kushaq ही विविध व्हेरियंट्समधील स्पर्धात्मक किंमती, वर्धित प्रमाणित सुरक्षा वैशिष्ट्ये आणि सर्वांगीण कामगिरीच्या जोरावर आघाडीवर आहे. आठ-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, रेअर सीट मसाजर आणि आवश्यक वैशिष्ट्यांचे मानकीकरण यांसारख्या सेगमेंटमध्ये प्रथमच समाविष्ट केलेल्या गोष्टींमुळे अगदी सुरुवातीच्या व्हेरिएंटपासूनच उत्तम मूल्य मिळते. प्रत्येक Škoda प्रमाणेच, नवीन Kushaq मध्येही आपल्या क्लासमधील सर्वोत्तम सुरक्षा, अतुलनीय ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि मालकीचा अभिमान हे गुण स्टँडर्ड म्हणून मिळतात.
नवीन Kushaq 1.0 TSI
नवीन Kushaq त्याच्या सिद्ध आणि केवळ टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनची मालिका कायम राखते. Kushaq 1.0 TSI हे मूल्य, कार्यक्षमता आणि तंत्रज्ञान यांचा सर्वोत्तम मिलाफ सादर करते तसेच याला सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनची जोड देण्यात आली असून, या श्रेणीतील सर्वप्रथम अशा आठ-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरमुळे या नवीन Škoda चा ड्रायव्हिंग अनुभव पूर्णपणे नव्याने परिभाषित केला जातो. ही SUV तिच्या टर्बोचार्ज्ड इंजिनमधून 85 kW शक्ती आणि 178 Nm टॉर्क निर्माण करते. 1.0 TSI मॅन्युअल मॉडेल 19.66 किमी/लिटर ARAI इतकी इंधन कार्यक्षमता देते, तर 8-स्पीड ऑटोमॅटिक मॉडेल 19.09 किमी/लिटर ARAI इतकी कार्यक्षमता देते.
नवीन Kushaq 1.5 TSI
अधिक दमदार कामगिरीची अपेक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी, 1.5 TSI इंजिन 110 kW शक्ती आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते तसेच हे इंजिन विशेष करून सात-स्पीड DSG ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. नवीन Kushaq मध्ये, 1.5 TSI व्हेरिएंटमध्ये चारही चाकांवर डिस्क ब्रेक्ससह येतो; तर Monte Carlo व्हेरिएंटमध्ये आकर्षक दिसणारे लाल रंगाचे ब्रेक कॅलिपर्स देण्यात आले आहेत. 1.5 TSI DSG 18.72 किमी/लिटरची इंधन कार्यक्षमता देते – ARAI. क्रूझिंग मोडमध्ये दोन सिलिंडर्स बंद करणाऱ्या Active Cylinder Technology मुळे, 1.5 TSI हे तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट आविष्कार ठरते. यामुळे, नवीन Kushaq 1.5 TSI कार्यक्षमतेशी कोणतीही तडजोड न करून वाहनप्रेमींना तृप्त करणारी कामगिरी, शक्ती आणि टॉर्क प्रदान करण्याचा त्यांचा वारसा पुढेही कायम राखेल याची खात्री मिळते.
मालकी हक्काची सुलभता एक स्टँडर्ड: Škoda Super Care
नवीन Kushaq ही Škoda Auto India च्या, मालकीचा अविरत अनुभव प्रदान करण्याच्या तत्त्वज्ञानाला पुढे नेते. आता हे Škoda Super Care सह येते: ज्यामध्ये 4 वर्षे किंवा 100,000-किलोमीटरची प्रमाणित वॉरंटी, तसेच 4 वर्षांची Roadside Assistance सेवा समाविष्ट आहेत ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळासाठी मनःशांती लाभते. याव्यतिरिक्त, ग्राहकांना दोन वर्षांपर्यंत किंवा 30,000 किलोमीटरपर्यंत चार मोफत सेवांचा लाभ मिळतो. वॉरंटी आठ वर्षापर्यंत, सशुल्क तत्त्वावर वाढवता देखील येते. त्याला सहा वर्षांची गंज-प्रतिबंधक वॉरंटी आणि तीन वर्षांची पेंट वॉरंटी यांची देखील जोड मिळाली आहे.


