गुरूग्राम, भारत, मार्च १८, २०२६ – सॅमसंग भारतात आपले नेक्स्ट-जनरेशन गॅलेक्सी ए सिरीज स्मार्टफोन्स लाँच करण्यासाठी सज्ज आहे. नवीन स्मार्टफोन्स गॅलेक्सी A57 ५जी आणि गॅलेक्सी A37 ५जी पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या नवीन स्मार्टफोन्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्टपणे फोटो व व्हिडिओज कॅप्चर करण्याची कॅमेरा क्षमता असेल. या दोन स्मार्टफोन्समध्ये नवीन एआय वैशिष्ट्यांची भर होण्याची देखील शक्यता आहे, ज्याला सॅमसंग ‘ऑसम इंटेलिजन्स’ म्हणते.
गॅलेक्सी A57 ५जी आणि गॅलेक्सी A37 ५जी धूळ व पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी६८ टिकाऊपणासह लाँच होऊ शकतात. या स्मार्टफोन्समध्ये दीर्घकालीन सिक्युरिटी अपडेट्स आणि ओएस अपग्रेड्स असतील, जो सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन्सचा हॉलमार्क आहे. गॅलेक्सी A57 ५जी आणि गॅलेक्सी A37 ५जी एआय युगामध्ये सर्वोत्तम डेटा सुरक्षिततेसाठी हार्डवेअर-आधारित तंत्रज्ञान सॅमसंग नॉक्स वॉल्टसह येतील. गॅलेक्सी A57 ५जी आणि गॅलेक्सी A37 ५जी या स्मार्टफोन्समध्ये सर्वोत्तम कार्यक्षमतेसाठी अपग्रेडेड प्रोसेसर्स, वाय-फाय ६ई आणि ब्ल्यूटूथ ६ असण्याची शक्यता आहे. नवीन डिवाईसेस किफायतशीर दरांमध्ये प्रीमियम वैशिष्ट्ये सादर करण्याच्या सॅमसंगच्या ग्राहक-अनुकूल धोरणाला दाखवतील. गॅलेक्सी ए सिरीज सॅमसंगची भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन सिरीज आहे, जेथे देशभरात एकूण जवळपास १०० दशलक्ष युनिट्सची विक्री झाली आहे.
*
**


