Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedअल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्प्याला १ एप्रिल पासून सुरुवात*

अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्प्याला १ एप्रिल पासून सुरुवात*

 

 

पुणे, दि.27: जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या गाध्यमातून १५ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांसाठी अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रम ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरु आहे. दुसऱ्या टप्यातील प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत १ एप्रिल २०२६ पासून नवीन बॅचेस सुरू करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमधील उपलब्ध सुविधा तसेच अत्याधुनिक प्रशिक्षण साधनांचा वापर करून तज्ञ मार्गदर्शकांकडून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा कार्यक्रम मागणी आधारित असून उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक प्रगत कौशल्ये उमेदवारांना प्रदान केली जाणार आहेत.

 

या प्रशिक्षणासाठी शिक्षण घेत असलेले, शिक्षण पूर्ण केलेले तसेच शिक्षण अर्धवट सोडलेले १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवती पात्र आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, यामुळे त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांत अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार यांनी https://forms.gle/5ex7TDsBzP2BxAP58 या लिंकवर किंवा क्युआर कोडमध्ये आपली माहिती भरावी. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे शहर, ४८१, रास्ता पेठ, पुणे-४११०११ या कार्यालयाच्या ०२०-२६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सुरेश वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments