इंडियास्टेटचा दोन प्रभावी अभ्यासक्रमांसह ई-लर्निंगच्या क्षेत्राममध्ये प्रवेश

तारां कित Avatar

आज, इंडियास्टेटने ऑनलाइन शिक्षणात प्रवेशाची घोषणा केली. IndiaStat भारत आणि त्याची राज्ये, प्रदेश, जिल्हे आणि संसदीय/विधानसभा मतदारसंघांवरील सर्वसमावेशक सामाजिक-आर्थिक आणि निवडणूक डेटाची अग्रगण्य आणि विश्वासार्ह पुरवठादार आहे.

दोन दशकांहून अधिक काळ जागतिक संशोधन समुदायाला अमूल्य डेटा प्रदान केल्यानंतर, IndiaState आता एक नवीन ई-लर्निंग प्लॅटफॉर्म IndiaStateEdu सह आपली क्षितिजे विस्तारत आहे, याद्वारे ज्ञान प्रसार आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आपली निरंतर वचनबद्धता दर्शवते. IndiaStateEdu चे दोन ऑनलाइन अभ्यासक्रम आहेत:-

1. भारतामध्ये निवडणूक कायद्यांमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course In Election Laws Of India) : या सखोल ऑनलाइन अभ्यासक्रमात जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील निवडणुकांचे संचालन करणाऱ्या कायदेशीर चौकटीवर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामध्ये भारतातील निवडणूक कायदे आणि प्रक्रियांची सखोल माहिती मिळते. या अभ्यासक्रमामध्ये भारतीय निवडणूक कायदे, भारतीय निवडणूक आयोगाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या, निवडणूक संबंधित प्रक्रिया, मतदारांचे हक्क, निवडणुकीशी संबंधित विवादांचे निराकरण इत्यादींचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाचा अभ्यास केल्यानंतर, विद्यार्थी त्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रोफाइल सुदृढ करू शकतात आणि त्यांचे कायदेशीर ज्ञान देखील वाढवू शकतात.

2. जीआयएस टूल्स आणि तंत्रज्ञानासोबत व्यापार विश्लेषण तसेच थिमॅटिक मॅपिंगमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course in Business Analysis and Thematic Mapping Using GIS Tools & Techniques): हा एक सर्वसमावेशक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना GIS टूल्स आणि तंत्रांचा वापर करून प्रभावी व्यवसाय विश्लेषण आणि थीमॅटिक मॅपिंगसाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान मिळते. याव्यतिरिक्त, अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना व्यवसाय विश्लेषणामध्ये उत्कृष्ट कौशल्ये देऊन सुसज्ज करतो, त्यांना व्यवसाय प्रक्रिया, डेटा विश्लेषण आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्याची सखोल माहिती देतो. सहभागी GIS टूल्स वापरून थीमॅटिक नकाशे तयार करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे देखील शिकतात, जे शहरी नियोजन, पर्यावरण विज्ञान आणि व्यवसाय बुद्धिमत्ता यासारख्या विविध क्षेत्रांसाठी आवश्यक आहेत.

हे दोन्ही अभ्यासक्रम संबंधित क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी तयार केले आहेत. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची क्षितिजे विस्तृत करतात, त्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांना ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करतात. विद्यार्थी केस स्टडीज आणि व्यवहारिक उदाहरणांद्वारे वास्तविक जगाची माहिती मिळवतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये हे ज्ञान प्रभावीपणे लागू करता येते. निवडणूक कायदे आणि GIS साधने आणि तंत्रांचे ज्ञान त्यांना उत्तम नोकरीच्या संधी मिळतात आणि करिअरमध्ये वृद्धि होते. जगभरातील विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी प्रस्तावित हे ऑनलाइन अभ्यासक्रम शिक्षणातील भौगोलिक अडथळे दूर करतात. या अभ्यासक्रमांमध्ये नावनोंदणीसाठी पात्र होण्यासाठी पदवीधर असणे अनिवार्य आहे, पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात बसलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

इंडियास्टेटचे संचालक डॉ. आर के ठुकराल, यांनी या नवीन शैक्षणिक उपक्रमाबद्दल उत्साह व्यक्त करताना सांगितलं की, “इंडियास्टेएडु (Indiastatedu) ही ज्ञान आणि शिक्षणाप्रती आमची वचनबद्धता दर्शवते. ऑनलाइन शिक्षणाच्या क्षेत्रातील सामाजिक-आर्थिक डेटा आणि माहितीमध्ये तज्ञ असण्याचा आम्हाला अभिमान आहे. आमचे अभ्यासक्रम लोकांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत ज्याद्वारे नवीन संधींचे दरवाजे उघडतात. आमचा असा विश्वास आहे की शिक्षणाचा प्रवास आयुष्यभर चालू राहतो आणि IndiaStateEdu सतत शिकण्याची संस्कृती जोपासण्यासाठी वचनबद्ध आहे.”

या अभ्यासक्रमांबद्दल, शुल्क आणि नावनोंदणी प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.indiastatedu.com ला भेट द्या. पहा. इंडियास्टेटएडु (Indiastateedu) जगभरातील विद्यार्थ्यांना या रोमांचक शैक्षणिक प्रवासात सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहे.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts