Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorized*ऑटो डीसीआर –महाखनिज प्रणालीमुळे गौण खनिज परवान्यांची प्रक्रिया होणार सुलभ*

*ऑटो डीसीआर –महाखनिज प्रणालीमुळे गौण खनिज परवान्यांची प्रक्रिया होणार सुलभ*

पुणे, दि. ३० मार्च (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ मधील तरतुदीनुसार गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी तात्पुरते परवाने देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ही परवानगी स्वयंचलित विकास नियंत्रण नियम प्रणाली (AUTO DCR)–महाखनिज या एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे दिली जाणार आहे.त्यामुळे गौण खनिज परवानगी अधिक सुलभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवानगी ही स्वयंचलित विकास नियंत्रण नियम प्रणाली (AUTO DCR) द्वारे दिली जाते. ही प्रणाली महाखनिज (Mahakhanij) पोर्टलशी संलग्न करण्यात आल्यामुळे, बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर पाया खोदाई मधील गौण खनिज उत्खनन व वाहतुकीची परवानगी अर्जदारांना तात्काळ उपलब्ध होणार आहे.

या नव्या प्रणालीमुळे बांधकाम व्यावसायिक व विकासकांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. परिणामी, परवानगी प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता व वेग वाढणार आहे. तसेच, महानगरपालिका हद्दीतून शासनाला अंदाजे १५० ते २०० कोटी रुपयांचे स्वामित्वधन प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दिनांक १ एप्रिल २०२६ पासून ही प्रणाली तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, संबंधित सर्व परवाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत याच प्रणालीद्वारे दिले जाणार आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व बांधकाम व्यावसायिक व विकासकांनी या सुलभ प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments