पुणे,18 डिसेंबर 2023 : फ्रीडम ऑफ डायबेटिस ( एफएफडी ) तर्फे नुकत्याच आयोजित मुक्तोत्सव या वार्षिक कार्यक्रमात इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन (आयडीएफ) च्या दक्षिण पूर्व आशियाई क्षेत्राचे चेअरमन इलेक्ट डॉ.बन्शी साबू, आयडीएफचे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.पीटर स्वार्झ आणि आयडीएफच्या दक्षिण पूर्व आशियाई क्षेत्राचे माजी अध्यक्ष व प्रख्यात मधुमेह तज्ञ डॉ.शशांक जोशी यांनी डॉ.प्रमोद त्रिपाठी यांचे मधुमेहाकडे बघण्याच्या क्रांतिकारी दृष्टीकोनाबाबत त्यांचे कौतुक केले.इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन हे 160 देश आणि विविध क्षेत्रातील 240 हून अधिक डायबेटिस असोसिएशन समाविष्ट असलेली शिखर संघटना आहे.
मुक्तोत्सव हा एफएफडीचा एक प्रमुख वार्षिक कार्यक्रम असून एफएफडीचा अनोखा कार्यक्रम पूर्ण केलेल्या तसेच ग्लुकोज टॅालरन्स चाचणी यशस्वीरित्या पास झालेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी आयोजित केला जातो.एफएफडीची उपचार प्रणाली ही प्रामुख्याने जीवनशैली आणि आहारावर लक्ष केंद्रित करते.
डॉ.प्रमोद त्रिपाठी यांनी आपल्या आजवरच्या कारर्किदीमध्ये मधुमेहींना गोळ्यांपासून आणि इन्शुलिनपासून मुक्त (रेमिशन) करण्यावर तसेच मधुमेहाचा प्रतिबंध करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.आजवर 15000 हून अधिक मधुमेही एफएफडीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इन्शुलिन आणि गोळ्यांपासून मुक्त झाले आहे.डॉ.प्रमोद त्रिपाठी यांच्या कार्याची दखल फक्त राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर अमेरिकन डायबेटिस असोसिएशन (एडीए) आणि युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबेटिस (ईएएसडी) यासारख्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या अभ्यासाद्वारे दखल घेतली गेली आहे.
डॉ.बन्शी साबू यांनी डॉ.त्रिपाठी यांच्या फ्रीडम फ्रॉम डायबेटिस दूरदर्शी कल्पनेचे कौतुक केले.