गुरूग्राम, मार्च ११, २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया लि. (एचएमआयएल) ने आज स्पोर्टी आणि उत्साहवर्धक कार्यक्षमता-प्रेरित एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा एन लाइन लाँच केली. ब्रॅण्ड क्रेटाचे यश व वारसाला पुढे घेऊन जात ह्युंदाई क्रेटा एन लाइन ट्रॅक प्रेरित आकर्षकता आणि साहसी राइडर्ससाठी डायनॅमिक ड्रायव्हिंग अनुभव यासह मिड-साइज एसयूव्ही विभागातील दर्जाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. ह्युंदाई क्रेटा एन लाइन पोर्टफोलिओमध्ये वैशिष्ट्यपूर्ण एन लाइन डिझाइन शैली, ट्यून केलेले डायनॅमिक्स व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे परिपूर्ण संतुलन आहे, ज्यामधून प्रत्येकवेळी कारमध्ये उत्साहवर्धक प्रवासाची खात्री मिळते.
ह्युंदाई क्रेटा एन लाइनच्या लाँचबाबत मत व्यक्त करत ह्युंदाई मोटर इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. उन सू किम म्हणाले, ”ह्युंदाई मोटर इंडियाने भावी तंत्रज्ञानामधील अग्रणी म्हणून आपले स्थान दृढ केले आहे, तसेच भारतीय ऑटोमोबाइल उद्योगामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे. बेंचमार्क उत्पादनांसह आम्ही गतीशीलता अनुभव वाढवण्याप्रती आणि अपवादात्मक ऑफरिंग्जसह ग्राहकांना आनंदित करण्याप्रती सातत्याने काम करत आहोत. लाँच करण्यात आलेल्या स्पोर्टी व कार्यक्षमता केंद्रित ह्युंदाई क्रेटा एन लाइनचा सर्वांमध्ये वरचढ दिसण्याची आणि ‘लिव्ह अनलीश’ म्हणजेच मुक्तपणे जगण्याची इच्छा असलेल्या ग्राहाकांची स्वप्ने व महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्याचा मनसुबा आहे. ब्रॅण्ड क्रेटाची लोकप्रियता आणि वारसाला पुढे घेऊन जात ह्युंदाई क्रेटा एन लाइन ह्युंदाईच्या एन लाइन पोर्टफोलिओला अधिक दृढ करेल आणि आधुनिक काळातील भारतीय ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करेल. आम्हाला विश्वास आहे की, ह्युंदाई क्रेटा एन लाइनच्या लाँचसह आम्ही धमाल राइडिंग अनुभवामध्ये अधिक उत्साहाची भर करू आणि साहसी राइडचा आनंद घेण्याची आवड असलेल्यांच्या गरजांची पूर्तता करू.”
ह्युंदाई क्रेटा एन लाइन डब्ल्यूआरसी-प्रेरित डिझाइनवर आधारित आहे, जी तुम्हाला चार प्रमुख आधारस्तंभांच्या आधारावर ‘लिव्ह अनलीश’ म्हणजेच मुक्तपणे जगण्यास प्रेरित करेल:
· एनर्जाइजिंग एक्स्टीरिअर्स
· एंगेजिंग इंटीरिअर्स
· एन्थुझियास्टिक परफॉर्मन्स
· एन्टायसिंग टेक्नॉलॉजी
एनर्जाइजिंग एक्स्टीरिअर्स
आधुनिक व डायनॅमिक ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये ट्रॅक प्रेरित आकर्षकता आहे आणि स्पोर्टी कार्यक्षमता देण्यासाठी विशेषरित्या डिझाइन करण्यात आली आहे, जी ग्राहकांसाठी ड्रायव्हिंग अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाते. स्पोर्टी लुकसाठी डिझाइन करण्यात आलेली ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये लक्षवेधक एन लाइन विशिष्ट स्पोर्टी फ्रण्ट ग्रिलसह एन लाइन एम्ब्लेम, नवीन फ्रण्ट बंपर डिझाइनसह रेड इन्सर्टस् आणि नवीन एन लाइन विशिष्ट फ्रण्ट स्किड प्लेट डिझाइन आहे.
डिझाइनमध्ये ‘वाव’ घटकाची भर करत ह्युंदाई क्रेटा एन लाइनचे साइड प्रोफाइल नवीन आर१८ (व्यास =४६२ मिमी) अलाई व्हील्स, तसेच रेड फ्रण्ट व रिअर ब्रेक कॅलिपर्स आणि साइड सिलवरील लाल रंगाच्या इन्सर्टससह डायनॅमिक लुक देते, ज्यामुळे ह्युंदाई क्रेटा एन लाइन रस्त्यांवर सर्वांचे लक्ष वेधून घेते. ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये बाजूला लक्षवेधक आकर्षकता, ब्लॅक पेंटेड ओआरव्हीएम, रूफ रेल्स आणि सी-पिलर गार्निश आहे, ज्यामुळे कारच्या विशिष्ट ओळखीमध्ये अधिक वाढ होते.
ह्युंदाई क्रेटा एन लाइन रिअर बॉडी ग्राहकांना नवीन एन लाइन विशिष्ट रिअर बंपर डिझाइनसोबत स्पोर्टी स्किलड प्लेट, रेड इन्सर्टस् आणि स्पोर्टी व ऐरोडायनॅमिक रिअर स्पॉइलरसह उत्साहवर्धक आकर्षकता देते. ग्राहकांना साहसी ड्रायव्हिंग अनुभव देणाऱ्या ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये स्पोर्टी ट्विन टिप एक्झॉस्ट आहे, जे ड्राइव्हमध्ये अधिक उत्साहाची भर करतात. ह्युंदाईची अद्वितीय व वैशिष्ट्यपूर्ण एन लाइन डिझाइन शैली असलेल्या ह्युंदाई क्रेटा एन लाइनमधील फ्रण्ट, साइड व रिअर प्रोफाइलमध्ये अद्वितीय एन लाइन एम्ब्लेम आहे, जे कारमध्ये अधिक विशिष्टतेची भर करतात.
ह्युंदाई क्रेटा एन लाइन एक्सटीअिर आकारमान:
लांबी x रूंदी x उंची
४३३०X१७९०X १६३५ मिमी (रूफ रॅकसह)
व्हीलबेस
२६१० मिमी
एंगेजिंग इंटीरिअर्स
शक्तिशाली ट्रॅक-प्रेरित ह्युंदाई क्रेटा एन लाइनच्या केबिनमध्ये अद्वितीय आधुनिक अॅथेलेटिझम समाविष्ट आहे. प्रिमिअम ब्लॅक स्पोर्टी इंटीरिअर्ससह रेड इन्सर्टस् केबिनमध्ये डायनॅमिक ऊर्जेची भर करतात, तसेच गिअर नॉब व स्टीअरिंग व्हीलवरील आकर्षक ‘एन’ बॅजिंग एकूण एन लाइन विशिष्टतेमध्ये अधिक भर करतात. प्रिमिअम लेदरेट सीट्ससह एन बॅजिंग आणि मेटल पेडल्स साहसी राइडर्सचे लक्ष वेधून घेईल, ज्यामधून संस्मरणीय ड्रायव्हिंग अनुभवाची खात्री मिळेल. ह्युंदाई क्रेटा एन लाइनमधील स्पोर्टी व आकर्षक एक्स्टीअर्स आणि प्रिमिअम एन बॅज असलेले इंटीरिअर्सचे मिश्रण ग्राहकांना स्टायलिश व डायनॅमिक ड्रायव्हिंग अनुभव देईल.
उत्साहपूर्ण परफॉर्मन्स
उत्साहपूर्ण कार्यक्षमता प्रदान करणाऱ्या ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये १.५ लीटर टर्बो जीडीआय इंजिनची शक्ती असण्यासह ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन (एन लाइन एक्सक्लुसिव्ह) आणि ७ स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) आहे. ८.९ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करणारी ह्युंदाई क्रेटा एन लाइन ११७.५ केडब्ल्यूची (१६० पीएस) अधिकतम शक्ती आणि २५३ एनएमचे (२५.८ kgm) अधिकतम टॉर्क देते. शहरी जीवनशैली आणि आऊटडोअर्सचा आनंद घेण्याच्या उत्साहामधून प्रेरित स्पोर्टी कार्यक्षमता केंद्रित ह्युंदाई क्रेटा एन लाइन ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन ड्राइव्हला धमाल स्पोर्टी ड्राइव्हमध्ये बदलण्यास प्रेरित करेल.
सर्वसमावेशक ड्रायव्हिंग अनुभवासाठी ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये ३ ड्राइव्ह मोड्स (इको, नॉर्मल व स्पोर्ट) आणि ट्रॅक्शन कंट्रोल मोड्स (स्नो, स्नॅड व मड) आहेत, जे विविध प्रदेशांमध्ये आरामदायी ड्रायव्हिंगची खात्री देतात.
नवीन आर१८ (व्यास =४६२ मिमी) अलॉई व्हील्स आणि स्पोर्टीयर सस्पेंशनसह ह्युंदाई क्रेटा एन लाइन धमाल एसयूव्ही ड्रायव्हिंग अनुभवासाठी उच्च गतीमध्ये स्थिरता आणि रस्त्यावरील वळणावर नियंत्रणाची खात्री देते. उत्साही ड्रायव्हिंगला अधिक आनंदित करत ट्यून केलेले स्टीअरिंग ग्राहकांना रस्त्यांवर उत्तम नियंत्रण, अधिक हाताळणी आणि अधिक चपतळतेची खात्री देईल.
पॉवरट्रेन आकडेवारी:
इंजिन
क्षमता (सीसी)
अधिकतम शक्ती (पीएस/आरपीएम)
अधिकतम टॉर्क (केजीएम/आरपीएम)
ट्रान्समिशश्न
इंधन कार्यक्षमता
(एआरएआयनुसार)
१.५ लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल
१४८२
१६० / ५५००
२५.८ / १५०० – ३५००
७ डीसीटी (ड्युअल क्लच ट्रान्समिशन)
आणि
६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन
७ डीसीटी: १५.८ किमी/लीटर
६एमटी: १८.० किमी/लीटर
एन्टायसिंग टेक्नॉलॉजी
जनतेसाठी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करत भारतीय ऑटोमोबाइल उद्योगामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याप्रती ह्युंदाई मोटर इंडियाच्या कटिबद्धतेसह ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जे ग्राहकांना अद्वितीय ड्रायव्हिंग अनुभवाची खात्री देते. केबिनमध्ये प्रवेश केल्यानंतर ग्राहकाला एकसंधीपणे एकीकृत केलेले कर्व्हीलिनियर २६.०३ सेमी (१०.२५ इंच) एचडी इन्फोटेन्मेंट आणि २६.०३ सेमी (१०.२५ इंच) डिजिटल क्लस्टरसह मल्टी-लँग्वेज यूआय डिस्प्ले पाहायला मिळते, जे भावी इंटरफेससह अद्वितीय सुस्पष्टता व कार्यक्षमता देते. अनेक उल्लेखनीय वैशिष्ट्यांसह २६.०३ सेमी (१०.२५ इंच) डिजिटल क्लस्टर कस्टमायझेशनला नव्या उंचीवर घेऊन जाते, तसेच ड्रायव्हर्स विविध ड्राइव्ह मोड्ससाठी डिझाइन करण्यात आलेल्या विविध थीम्समधून निवड करू शकतात. याव्यतिरिक्त, यामध्ये आवश्यक एडीएएस अलर्टस् व डिस्प्लेसह ब्लाइण्ड स्पॉट व्ह्यू मॉनिटर आहे, ज्यामुळे रस्त्यावर अधिक सुरक्षितता व दक्षतेची खात्री मिळते.
कनेक्टीव्हीटीची क्षमता
प्रत्येक ड्राइव्ह आरामदायी व आनंददायी करणाऱ्या ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये ७० हून अधिक ह्युंदाई ब्ल्यूलिंक कनेक्टेड कार वैशिष्ट्ये आहेत, ज्यामधून ग्राहकांना सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. ह्युंदाई ब्ल्यूलिंकमध्ये स्मार्टफोन व स्मार्टवॉच कनेक्टीव्हीटीसह वीअर ओएस बाय गुगल, वॉच ओएस बाय अॅप्पलसाठी स्मार्टवॉच अॅप्लीकेान आणि सॅमसंगच्या गॅलॅक्सी वॉचेससाठी टायझेन ओएस आहे.
ग्राहकांना अद्वितीय नियंत्रण व सोयीसुविधेसह सक्षम करणाऱ्या ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये आवश्यक वेईकल वैशिष्ट्यांसाठी १४८ एम्बेडेड व्हीआर वॉईस कमांड्स एकीकृत करण्यात आल्या आहेत, जसे सनरूफ ओपन/क्लोज, सीट व्हेंटिलेशश्न कंट्रोल, क्लायमेट कंट्रोल – टेम्परेचर, फॅन स्पीड कंट्रोल, विंड डायरेक्शन आणि एआर-इनटेक टाइप कंट्रोल (फ्रेश/सर्क्युलेशन) सह इन-वेईकल असिस्टण्स. ह्युंदाई क्रेटा एन लाइनच्या केबिनमध्ये अपमार्केट वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल (डीएटीसी), पॅनोरॅमिक सनरूफ, ८ वे पॉवर ड्राइव्ह सीट, फ्रण्ट व्हेंटिलेटेड एन लाइन बॅज सीट्स, वायरलेस चार्जर, यामधून प्रत्येक प्रवास आनंददायी व आरामदायी होण्याची खात्री मिळते.
ड्रायव्हिंग अनुभव अधिक उत्साहित करत ह्युंदाई क्रेटा एन लाइन सर्वोत्तम बास प्रिमिअम साऊंड ८ स्पीकर सिस्टमच्या माध्यमातून मधुरमय संगीत अनुभव देते, ज्यामुळे ग्राहक ड्राइव्ह करण्यासह उत्साहवर्धक मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतात. एकसंधी म्युझिक स्ट्रिमिंग अनुभवाची खात्री देत ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये इन-बिल्ट म्युझिक स्ट्रिमिंग अॅप्लीकेशन जिओसावन प्रो (एक वर्षाच्या कॉम्प्लीमेण्टरी सबस्क्रिप्शनसह) आहे. यामुळे ग्राहक जाहिरात-मुक्त म्युझिकचा आनंद घेऊ शकतात, ज्यामधून त्यांना नवीन व ट्रेण्डिंग गाणी शिफारशी, क्यूरेटेड प्लेलिस्ट्स मिळतात, तसेच ते आर्टिस्ट्स व अल्बम्सद्वारे म्युझिक सर्च करू शकतात आणि १६ भाषांमध्ये म्युझिक स्ट्रिमिंग उपलब्ध आहे. ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये कार वॉईस कमांडसाठी अॅलेक्सा होम देखील आहे, ज्यामुळे ग्राहक त्यांच्या घरांमधून आरामात दूरुरनच कारवर नियंत्रण ठेवू शकतात.
ह्युंदाई क्रेटा एन लाइन आधुनिक ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करते, अपेक्षांपलीकडील सर्वांगीण मालकीहक्क अनुभव देते.
सुरक्षिततेला प्राधान्य
परिपूर्ण सुरक्षितता पॅकेज प्रदान करण्यावर मुख्यत्वे भर देत ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये अनेक प्रगत अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत, जे ग्राहकांना सर्वांगीण सुरक्षितता देतात. सुरक्षिततेला नव्या उंचीवर घेऊन जात ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये ग्राहकांना आनंद देण्यासाठी विशेष वैशिष्ट्य – अद्वितीय डॅशकॅमसह ड्युअल कॅमेराची भर करण्यात आली आहे. ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये ४२ प्रमाणित सुरक्षितता वैशिष्ट्ये आहे, जसे ६ एअरबॅग्ज, चारही डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिअी कंट्रोल (ईएससी), इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्ड, हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी), टीपीएमएस हायलाइन, ऑटो हेडलॅम्प आणि इतर अनेक.
ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये प्रबळ बॉडी रचना आहे, ज्यामध्ये अॅडवान्स्ड हाय स्ट्रेन्थ स्टील (एएचएसएस) व हाय स्ट्रेन्थ स्टील (एचएसएस)च्या महागड्या उपयोजनासह हॉट स्टॅम्पिंग आहे, ज्यामधून प्रवाशांना केबिनमध्ये सुरक्षिततेची खात्री मिळते. रस्त्यावर अधिक सुरक्षितता देत ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये ७० हून अधिक प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत, जसे ह्युंदाई स्मार्टसेन्स लेव्हल २ एडीएएस, सराऊंड व्ह्यू मॉनिटर, फ्रण्ट पार्किंग सेन्सर, ब्लाइण्ड स्पॉट व्ह्यू मॉनिटर आणि इतर अनेक, यामुळे ड्राइव्ह करताना ग्राहकांना अधिक सुरक्षिततेची खात्री मिळते.
ह्युंदाई क्रेटा एन लाइनमध्ये ह्युंदाई स्मार्टसेन्स लेव्हल २ अडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स (एडीएएस)चे परिपूर्ण सूट आहे, ज्यामध्ये स्पोर्टी एसयूव्हीमध्ये अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सुरक्षितता वैशिष्ट्ये एकसंधीपणे समाविष्ट असल्याची खात्री मिळते. ह्युंदाई स्मार्टसेन्स सूटमध्ये १९ वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये फॉरवर्ड कॉलिजन वॉर्निंग अँड अवॉयडन्स असिस्ट (कार/सायकल/पादचारी/जंक्शन टर्निंग), ब्लाइण्ड-स्पॉट व्ह्यू मॉनिटर, ब्लाइण्ड स्पॉट कॉलिजन वॉर्निंग अँड अवॉयडन्स असिस्ट, लेन कीपिंग असिस्ट, स्मार्ट क्रूझ कंट्रोलसह स्टॉप अँड गो आणि इतर अनेक.
रंग आणि उपलब्धता:
ह्युंदाई क्रेटा एन लाइन ३ मोनो-टोन रंग पर्यायांसह नवीन व एन लाइन एक्सक्लुसिव्ह: टायटन ग्रे मॅट, अबायस ब्लॅक, अॅटलास व्हाइट आणि थंडर ब्ल्यूसह ब्लॅक रूफ, अॅटलास व्हाइटसह ब्लॅक रूफ व शॅडो ग्रेसह ब्लॅक रूफ या ३ ड्युअल-टोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ह्युंदाई क्रेटा एन लाइन भारतभरातील कोणत्याही ह्युंदाई सिग्नेचर डिलरशिपमध्ये उपलब्ध असेल.
ह्युंदाई क्रेटा एन लाइनची वैशिष्ट्ये:
एनर्जाइजिंग एक्स्टीरिअर्स
एंगेजिंग इंटीरिअर्स
एन्थुझियास्टिक परफॉर्मन्स
एन्टायसिंग टेक्नॉलॉजी
सुरक्षितता वैशिष्ट्ये
फ्रण्ट बंपर (एन लाइन एक्सक्लुसिव्ह डिझाइन + रेड इन्सर्टस्)
ऑल ब्लॅक स्पोर्टी इंटीरिअर्ससह रेड इन्सर्टस्
१.५ लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिनसह ६ स्पीड एमटी (एन लाइन एक्सक्लुसिव्ह)आणि ७ स्पीड डीसीटी
एकसंधीपणे एकीकृत केलेले कर्व्हीलिनियर २६.०३ सेमी (१०.२५ इंच) एचडी इन्फोटेन्मेंट आणि २६.०३ सेमी (१०.२५ इंच) डिजिटल क्लस्टर
४२ प्रमाणित सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि ७० हून अधिक एकूण सुरक्षितता वैशिष्ट्ये
फ्रण्ट ब्लॅक क्रोम रॅडिएटर ग्रिल (एन लाइन एक्सक्लुसिव्ह)
एक्सक्लुसिव्ह एन लाइन स्टिअरिंग व्हील
स्पोर्टीयर सस्पेंशन आणि उच्च गतीमध्ये स्थिरतेसाठी स्टिअरिंगृ प्लाण्टेड कॉर्नरिंग आणि आत्मविश्वासपूर्ण व उत्साहवर्धक ड्राइव्ह
मल्टी लँग्वेज यूआय डिस्प्ले
६ एअरबॅग्ज
नवीन फ्रण्ट स्किड प्लेट्स (एन लाइन एक्सक्लुसिव्ह डिझाइन)
गिअर नॉबसह एन लाइन लोगो
एडीएएस अलर्ट डिस्प्ले आणि ब्लाइण्ड स्पॉट व्ह्यू मॉनिटर डिस्प्ले २६.०३ सेमी (१०.२५ इंच) डिजिटल क्लस्टर
चारही डिस्क ब्रेक्स
फ्रण्ट फेण्डर, फ्रण्ट बंपर, टेलगेटवर एन लाइन एम्ब्लेम
सीट अपहोल्स्टरीसह एन लाइन लोगो आणि एक्सक्लुसिव्ह डिझाइन
ह्युंदाई क्रेटा एन लाइन एक्सक्लुसिव्ह: डॅशकॅमसह ड्युअल कॅमेरा
इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो/होल्ड
आर१८ (व्यास ४६२ मिमी) अलॉई व्हील्स
इंटीरिअरमध्ये रेड इन्सर्टस् (एसी व्हेंट्स)
७० हून अधिक ब्ल्यूलिंक कनेक्टेड वैशिष्ट्ये
टीपीएमएस हायलाइन
व्हील हब कॅपवर एन लोगो
इंटीरिअरमध्ये रेड स्टिचिंग (स्टिअरिंग व्हील, गिअर नॉब, सीट)
१४८ एम्बेडेड व्हीआर वॉईस कमांड्स
हिल असिस्ट कंट्रोल
फ्रण्ट रेड पेंटेड कॅलिपर
मेटल पेडल्स
ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल
ऑटो हेड लॅम्प
रिअर रेड पेंटेड कॅलिपर
अॅम्बियण्ट लाइट्स (रेड कलर)
पॅनोरॅमिक सनरूफ
इलेक्क्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल
ब्लॅक पेंटेड ओआरव्हीएम
८ वे पॉवर ड्राइव्हर सीट
डॅशकॅमसह ड्युअल कॅमेरा
ब्लॅक पेंटेड सी-पिलर गार्निश
फ्रण्ट व्हेंटिलेटेड सीट्स
ह्युंदाई स्मार्टसेन्ससह लेव्हल २ एडीएएस
ब्लॅक पेंटेड रूफ रेल्स
बोस प्रिमिअम साऊंड ८ स्पीकर सिस्टम
सराऊंड व्ह्यू मॉनिटर
बॉडी कलर डोअर हँडल्स
वायरलेस चार्जर
फ्रण्ट पार्किंग सेन्सर
साइड सिलसह रेड इन्सर्टस्
होम टू कार वॉईस कमांड्स
ब्लाइण्ड स्पॉर्ट व्ह्यू मॉनिटर
नवीन रिअर बंपर (एन लाइन एक्सक्लुसिव्ह डिझाइन + रेड इन्सर्टस्)
नवीन रिअल स्किड प्लेट डिझाइन (एन लाइन एक्सक्लुसिव्ह डिझाइन)
एक्सक्लुसिव्ह रिअर स्पॉइलर
जिओसावन प्रो
एक्सक्लुसिव्ह ट्विन टिप मफलर
एक्सक्लुसिव्ह मॅटे बॉडी कलर – टायटन ग्रे मॅटे
Variant
Powertrain
Ex- Showroom Price
Hyundai CRETA N Line Variants & Pricing
N8
1.5I T-GDi + 6 MT
16 82 300
N8
1.5I T-GDi +7DCT
18 32 300
N10
1.5I T-GDi + 6 MT
19 34 300
N10
1.5I T-GDi + 7 DCT
20 29 900


