पुणे, १२ मार्च : अध्यात्मिक मार्गदर्शक आणि दूरदर्शी द्रष्टा म्हणून ओळखले जाणारे महान तपस्वी परमपूज्य श्री कृष्ण (विश्वनाथ) कर्वे गुरूजींची पहिली पुण्यतिथी होती. यावेळी कोथरूड येथे विद्यापीठात माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड सहित विद्यापीठातील संचालक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी त्यांचे स्मरण करून श्रध्दांजी वाहिली.
यावेळी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, परमपूज्य कर्वे गुरूजींनी आपले जीवन अत्यंत नम्र, साधे आणि आनंदी जगले. ते अत्यंत शुद्ध धर्मनिष्ठ, सदाचारी आणि आनंदी व्यक्तिमत्व होते. ते लहानपणापासून माणकेश्वर विष्णू मंदिरात पूजा आणि ध्यान करत असत. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी माणकेश्वर विष्णू मंदिरात श्री विष्णू लक्ष्मीचे पहिले दर्शन घेतले. यानंतर त्यांचे आयुष्य बदलले.
प्रकाश दुबे म्हणाले, कर्वे गुरूजींच्या सहवासात असताना ज्यांना याचा अनुभव आला ते शुद्ध आत्मा आहेत. ते अध्यात्मिक शक्तीने परिपूर्ण आहे आणि त्यांच्या संपर्कात येताच प्रत्येकाला शांती, प्रेम, आनंद आणि आपलेपणा जाणवाल. सध्याच्या युगात धर्म आणि विज्ञान एकत्र केल्याने मानवतेचा विकास होईल. प्रभू राम एका कल्पनेचे मूर्त स्वरूप होते ज्यावरी प्रत्येकाने अनुसरण केले पाहिजे.
हिंदी साहित्यिक डॉ. सुनील देवधर म्हणाले, थोर तपस्वी साधक कर्वे गुरूजी हे देहाच्या पलीकडे होते. ते लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असत. म्हणून ते महान गुरू आहेत. हे समजून घेण्यासाठी आपल्याला खोलवर जावे लागेल.
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस.एम.पठाण म्हणाले, ते एक परिपूर्ण पुरूष आणि आत्मा होते. यानंतर डब्ल्यूपीयूचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, डॉ. टी.एन.मोरे आणि डॉ.मिलिंद पात्रे यांनी आपले विचार मांडले.
यावेळी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, सर्व विभागप्रमुख व संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.
महान तपस्वी कर्वे गुरूजी प्रथम पुण्यतिथीनिमित्त एमआयटी डब्ल्यूपीयू येथे श्रद्धांजली
RELATED ARTICLES


