Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedअंजू तुरंबेकर यांची वुमेन्स नॅशनल अकॅडमीच्या टेक्निकल डायरेक्टर (तांत्रिक संचालक) आणि भूतान...

अंजू तुरंबेकर यांची वुमेन्स नॅशनल अकॅडमीच्या टेक्निकल डायरेक्टर (तांत्रिक संचालक) आणि भूतान U-17 महिला संघाच्या हेड कोच (मुख्य प्रशिक्षक) पदावर नियुक्ती


• भारतीय प्रशिक्षक अंजू तुरंबेकर भूतानमधील महिला फुटबॉलला देणार नवी दिशा
• ऐतिहासिक पाऊल: अंजू तुरंबेकर भूतानच्या महिला फुटबॉलचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला

भुतान फुटबॉल फेडरेशन ने अभिमानाने जाहीर केले आहे की अंजू तुरंबेकर यांची राष्ट्रीय महिला फुटबॉल अकॅडमीच्या तांत्रिक संचालकपदी तसेच U-17 महिला राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे अंजू तुरंबेकर या आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. हा महिला फुटबॉलच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

महाराष्ट्रातून आलेल्या अंजू या भारतीय आणि आशियाई फुटबॉलमधील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. सिंगापूरमधील यशस्वी आंतरराष्ट्रीय अनुभव घेतल्यानंतर त्या आता आपला अनुभव, दृष्टीकोन आणि नेतृत्व भूतानमध्ये आणत आहेत. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे, नवीन पिढीतील महिला फुटबॉलपटू घडवणे आणि त्यांना प्रेरणा देणे.

त्यांचा प्रवास हा मेहनत, जिद्द आणि उत्कृष्टतेच्या ध्यासाचा आहे. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी भारतीय फुटबॉलमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आशियातील आघाडीच्या महिला प्रशिक्षकांपैकी एक म्हणून मान्यता मिळवली आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कारकीर्दी व्यतिरिक्त तुरंबेकर यांनी भारतामध्ये एटी फाउंडेशन च्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुली आणि युवकांना फुटबॉल, शिक्षण आणि जीवन कौशल्यांच्या माध्यमातून सक्षम केले आहे.

अंजू यांच्या कारकिर्दीत कोचिंग, ग्रासरूट आणि युवा विकास, कोच प्रशिक्षण आणि आशियातील विविध देशांमध्ये काम करण्याचा आंतरराष्ट्रीय अनुभवांचा समावेश आहे. त्यांनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन, फिफा, डेम्पो स्पोर्ट्स क्लब, फुटबॉल एसोसिएशन ऑफ सिंगापूर अश्या नामांकित फुटबॉल संस्थांसोबत काम केले आहे. त्यामुळे त्या फुटबॉल क्षेत्रातील एक मान्यताप्राप्त आणि आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात.

भुतान फुटबॉल फेडरेशन ने त्यांचे स्वागत करून त्यांच्या नेतृत्वामुळे भूतानमधील महिला फुटबॉलला नवी उंची मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments