पुणे दिनांक ३ एप्रिल
पुण्यात मुसळधार पाऊस व अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी असूनही ऑलिंपिकपटू मनोज पिंगळे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, आमदार हेमंत रासने, शिव छत्रपती पुरस्कार विजेते देविदास जाधव यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामवंत खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व हितचिंतकांच्या उपस्थितीत क्रीड़ा भारतीचा वर्धापन दिन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
सन १९९२ मध्ये पुणे शहरातच हनुमान जयंतीचे औचित्य साधून क्रीड़ा भारती या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. वर्धापन दिनानिमित्त नेहरू स्टेडियम येथील क्रीड़ा भारतीचे कार्यालय, के ब्लॉक, दादावाडी जैन मंदिरासमोरील गेट पुणे येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या समारंभास रा.स्व. संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, खेळाडू शांताराम जाधव, मनोज पिंगळे, देविदास जाधव, मनोज एरंडे, गोपाळ मिरजकर, प्रसाद खटावकर, शिरीन गोडबोले, सचिन गोडबोले, अतुल वाकणकर, गणेश पुरंदरे, शरद केळकर, सुषमा सावंत चव्हाण, संगीता सोनावणे, डॉक्टर संजय करवडे, जितेंद्र वाळिंबे, गणेश पुरंदरे, वसंत गोखले, सत्यजित शिंदे, सुनील नेवरेकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, राजकीय क्षेत्रातील आमदार हेमंत रासने, महापालिका सदस्य सई थोपटे, ऐश्वर्या थोरात, प्रियांका शेंडगे, सुनिल पांडे, शैक्षणिक क्षेत्रातील ॲडव्होकेट एस. के. जैन, दिलीप शेठ, विजय भालेराव, सीए राहुल मिरासदार, बांधकाम क्षेत्रातील दिलीप कोटीभास्कर, प्रसार माध्यम क्षेत्रातील राजन वडके, संजय दुधाणे, सुनिल जगताप, अंजली तागडे, मोहिनी घारपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
क्रीड़ा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राजजी चौधरी यांच्यासह विजय पुरंदरे, विनायक बापट, विजय रजपूत, हरिष अनगोळकर, अनुजा दाभाडे, राजेंद्र शिदोरे, जयंत गोखले, मनाली देव, दीपक मेहेंदळे, आनंद कंदलगांवकर, आनंद कोल्हारकर, यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते
हंसिका पाटीलची चित्तथरारक प्रात्यक्षिके
हुजूरपागा प्रशालेची आठ वर्षांची खेळाडू हंसिका पाटील हिने दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी, सुरूळ इत्यादी शिवकालीन युद्ध कलेची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिचे वडील हेमंत पाटील हे तिला मार्गदर्शन करतात.


