Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedलिम्काचा फीड आता अनन्याच्या हाती: ब्रँड ॲम्बेसेडर आणि सोशल मीडिया लीड म्हणून...

लिम्काचा फीड आता अनन्याच्या हाती: ब्रँड ॲम्बेसेडर आणि सोशल मीडिया लीड म्हणून अनन्या पांडे यांनी धुरा स्वीकारली

नवी दिल्‍ली, 9 एप्रिल २०२६: लिम्काच्या सोशल मीडिया फीडमागे आता एक नवीन नाव आहे, जिचा स्वतःचा मोठा चाहतावर्ग आहे! भारतातील लोकप्रिय लाइम एन लेमनी पेय लिम्काने अनन्या पांडे यांची दुहेरी भूमिकेत नियुक्ती केली आहे. अनन्या आता ब्रँडचा नवीन चेहरा असण्‍यासोबत सोशल मीडिया मॅनेजरची धुराही सांभाळणार आहेत. ब्रँडने ऑनलाइन जगात कसे दिसावे, कसे बोलावे आणि व्‍यक्तींशी कसे कनेक्‍ट व्‍हावे, याचे सर्व अधिकार आता या अभिनेत्रीकडे असतील.

लिम्का गर्लचे भारतीय संस्कृतीत नेहमी खास स्थान राहिले आहे आणि गेल्या प्रत्येक पिढीचा आपापला फ्रेशनेस आयकॉन राहिला आहे. २०२६ मध्ये, उत्साही आणि खेळकर अनन्या पांडे नवीन लिम्का गर्ल म्हणून समोर आल्‍या आहेत. पण एका आगळ्यावेगळ्या प्रयोगात लिम्काने आपल्या कंटेंट विश्वाची सूत्रे अनन्या यांच्‍या हाती सोपवली आहेत. त्‍यांचे कौशल्‍य, विनोदीशैली आणि कॅमेऱ्यासमोर वावरतानाची सहजता आता २०२६ मधील लिम्काची ओळख ठरवणार आहे. गेल्या पाच दशकांपासून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लाइम एन लेमनी स्‍वाद आणि वैशिष्‍ट्यपूर्ण क्‍लाऊडी बबल्‍ससह भारताला ताजेतवाने करणाऱ्या या ब्रँडच्या वारशाला आता धाडसी आणि नवा आवाज मिळाला आहे.

हे सर्व नवीन व उत्‍साहवर्धक कंटेंट ब्रँडच्या ‘फिल द ताज़गी’ या नवीन मोहिमेचा भाग असेल. कडक उन्हाळ्यात ताजेपणाची झुळूक देणारा फ्रेश, उत्साही आणि बबली कंटेंट पाहण्यासाठी सज्ज व्हा. अगदी ‘फिल द ताज़गी’ ही ओळ सुद्धा ब्रँडच्या सिग्नेचर रिफ्रेशमेंटचा आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव घेण्याचे आवाहन करते.

कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाच्‍या हायड्रेशन, स्पोर्ट्स आणि टी विभागाच्‍या मार्केटिंगच्‍या सीनियर डायरेक्‍टर अंकिता महना म्हणाल्या, “लिम्का नेहमी सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग राहिली आहे. व्‍यक्तींना साध्या आणि त्वरित रिफ्रेशची गरज भासते, तेव्हा ते लिम्काकडे वळतात. ब्रँडच्या या नवीन अध्यायात पदार्पण करताना आमचा अद्वितीय स्‍थान निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे, जे तितकेच सहज आणि प्रभावी असेल. अनन्या यांच्‍याकडे आपसूक कंटेंट समज आणि भारतातील तरूणांसोबत असलेला सखोल सोशल मीडिया कनेक्ट याचे दुर्मिळ मिश्रण आहे. लिम्काचे स्वरूप कसे असावे, हे ठरवण्याची धुरा त्‍यांच्‍याकडे सोपवून आम्ही ब्रँडसाठी अधिक सहभागी आणि खास व्यासपीठ तयार करत आहोत.”

अनन्या पांडे म्‍हणाल्‍या, “माझ्या चाहत्यांशी आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया हे मोठे माध्यम आहे. त्यामुळे, लिम्काने मला सांगितले की त्यांना फक्त एका पोस्टमध्ये मी नकोय, तर मला संपूर्ण फीड चालवायला द्यायची आहे, तेव्हा मला ते खूप वेगळे आणि आव्हानात्मक वाटले. सोशल मीडिया मॅनेजर होणे हा माझ्यासाठी आतापर्यंतच्या सर्वात उत्‍साहवर्धक प्रोजेक्ट आहे. मी स्वतः लाइम एन लेमनी ताजेपणाचा अनुभव घेत लहानाची मोठी झाले आहे आणि आता प्रत्येकाला त्यांच्या सोशल मीडिया फीडवर ही ताज़गी अनुभवता येईल, याची मी खात्री घेणार आहे.”

अॅटम नेटवर्कचे (लिम्काची सोशल मीडिया एजन्सी) सह-संस्‍थापक व सीओओ यश कुलश्रेष्ठ म्हणाले, “अनन्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावरील ओरिजिनल क्वीन राहिल्‍या आहेत, ज्‍यामुळे त्‍या लिम्कासाठी उत्तम सहयोगी ठरल्‍या आहेत. त्‍या ब्रँडचा चेहरा असण्‍यासोबत त्यामागील सक्रिय सर्जनशील आवाज देखील आहेत. लिम्का आता नवीन अनुभूती आणि नवा आवाज सादर करत आहे आणि या वर्षासाठी आम्ही आखलेल्या अनेक रोमांचक कामांपैकी ही पहिली पायरी आहे.

सुरुवातीपासून, आम्हाला जाहिरातींच्या जुन्या व ठराविक शैलीमधून बाहेर पडायचे होते आणि अद्वितीय मोहिम आखायची होती, जी प्रेक्षकांना ब्रँडच्या गाथेत सहभागी करून घेईल. आम्ही लवकरच टीव्हीसी आणि या मोहिमेची मोठी यंत्रणा कार्यान्वित करण्यास उत्सुक आहोत. याद्वारे आम्ही लिम्कामध्ये नवी ऊर्जा भरून त्याला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देणार आहोत.”

या मोहिमेच्या शुभारंभाचा भाग म्हणून अनन्या पांडे त्‍यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून या मोहिमेचा प्रसार करतील. तसेच, त्‍या इंस्टाग्रामसह लिम्काच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्याचे ट्रेंड्स, अनौपचारिक क्षण आणि संवादात्मक कथांच्या माध्यमातून ‘ताज़गी’ घेऊन येतील. यामुळे लिम्काचा अनुभव व्‍यक्तींच्‍या दैनंदिन डिजिटल संवादाचा भाग बनेल.

आपला प्रदीर्घ वारसा जपत आणि आधुनिक काळातील नवा आवाज स्वीकारत लिम्का ग्राहकांना एक घोट घेऊन लाइम एन लेमनीच्या ओळखीचा आणि खास लिम्का शैलीतील अनुभवाचा पुन्हा एकदा आनंद घेण्याचे आवाहन करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments