यशाची गुरुकिल्ली ही आपल्या हातात असते स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजन यांचे मत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या यशवंतराव मोहिते काॅलेज आॅफ आर्टस, काॅमर्स अॅन्ड सायन्सच्या वतीने सन्मान सोहळा

तारां कित Avatar

पुणे : प्रोफेशनल स्कायडायव्हर म्हणून करिअरची सुरुवात करताना मुलगी म्हणून थांबवले जात होते. स्पॉन्सर मिळत नव्हते, एवढेच नाही तर भारतात याला खेळ म्हणून मान्यता देखील नव्हती. असे अनेक अडथळे पार करून स्कायडायव्हिंग मधील अनेक विक्रम भारतीय म्हणून स्वतःच्या नावावर केले आहेत, याचा अभिमान वाटतो. यशाची गुरुकिल्ली ही आपल्या हातात असते एका दिवसात कोणतेही यश मिळत नाही प्रत्येक यशामागे एक गोष्ट असते. असे मत स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजन यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या यशवंतराव मोहिते काॅलेज आॅफ आर्टस, काॅमर्स अॅन्ड सायन्सच्या वतीने क्रीडा क्षेत्रात जागतिक विक्रम करणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणे ते तिरुपती हे सुमारे १०९३ किमी अंतर ६ दिवसात सायकल वर पूर्ण करणारे भारती विद्यापीठाच्या वाय एम कॉलेज मधील प्राध्यापक डॉ. सुहास मोहिते, प्रा. अरुण पवार , उल्हास पवार आणि बुद्धिबळ पटू १६ वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियन आकांक्षा हगवणे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.विवेक सावजी, प्रभारी प्राचार्य डाॅ. विवेक रणखांबे, लॉ कॉलेजच्या प्राचार्य उज्ज्वला बेंदाळे, ललितकला विभागाचे संचालक प्रा. शारंगधर साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

शितल महाजन म्हणाल्या, एव्हरेस्ट समोरील जागतिक विक्रमानंतर माझा पहिला सन्मान आहे. पालकांनी मुलांना सहकार्य करणे आणि स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. भारतीय स्त्रीला फक्त एका संधीची गरज असते जर ती मिळाली तर ती स्त्री काहीही करू शकते. परंतु संधी देण्याची ही सुरुवात घरापासून व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

विवेक सावजी म्हणाले, आपल्या महाविद्यालयातील मुलांनी केलेले जागतिक विक्रम पाहून त्यांचा अभिमान वाटतो. आई वडिलांनी मुलांना ध्येयपूर्तीसाठी आधार देणे आवश्यक आहे. मुलांमध्ये परिश्रम करणे आणि ध्येयासक्ती असणे गरजेचे आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती असणे देखील गरजेचे आहे.

डॉ. विवेक रणखांबे म्हणाले, बौद्धिक, मानसिक, शारिरीक अशा विविध क्षमतांचा एका अधिभौतिक क्षमतेच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सदाशिव पाटील यांनी तर प्रा. एन. एम. कुंभार यांनी आभार मानले.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts