Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसांगवीत संजोग वाघरेंच्या गावभेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद - ग्रामस्थ, नागरिकांकडून...

सांगवीत संजोग वाघरेंच्या गावभेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद – ग्रामस्थ, नागरिकांकडून संजोग वाघेरे पाटील यांचे जंगी स्वागत

पिंपरी, (प्रतिनिधी):- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गाव भेट दौ-याअंतर्गत मावळ लोकसभा संघटक तथा पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी सांगवी परिसरात भेट दिली. या झंझावाती दौऱ्यास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून त्यांचे ठिक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक, तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आदि मोठ्या संख्येने या गाव भेट दौ-या सहभागी झाले होते. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयासाठी सांगवीतील नागरिकांनी शब्द दिला.

यावेळी संजोग वाघेरे पाटील तुम्हीच होणार ‘खासदार’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी आणि स्थानिक गावकऱ्यांनी दिला. सांगवीतील प्रत्येक ठिकाणी थांबून वाघेरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनीही मनमोकळेपणाने वाघेरे पाटील यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सांगवीतील सर्व ग्रामस्थ आणि नागरिक यांनी वाघेरे यांना खासदार करण्याचा निर्धार व्शुयक्त करत शुभेच्छा दिल्या.

या दौ-यात संजोग वाघेरे पाटील यांनी संवाद साधताना मावळ लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. पिंपरी चिंचवड आणि मावळ या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी आपण आग्रही राहू, असे‌ म्हटले आहे.

——————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments