▪️
पुणे – दि १३ – संयुक्त राष्ट्रसंघातर्फे वॉशिंग्टन येथे आयोजित ‘६८व्या कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन’ या परिषदेत पुण्यातून डॉ. अंजली देशपांडे सहभागी झाल्या आहेत. त्या दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या मानद सचिव आहेत.
महिलांसंबंधीच्या विविध उपाययोजना, धोरणे यांवर जागतिक स्तरावर विचारमंथन करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची ‘युएन वुमन’ ही संघटना काम करते. येत्या २२ मार्च पर्यंत संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ‘६८वी कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन’ ही परिषद आहे.
दृष्टी संस्थेच्या माध्यमातून डॉ. अंजली देशपांडे यांनी 30 वर्षांहून अधिक काळ भारतातील महिला आणि बालिका यांच्याशी संबंधित समस्यांचा अभ्यास आणि संशोधन करून त्याविषयी अनेक महत्त्वाचे अहवाल प्रसिद्ध केले आहेत.
डॉ. अंजली देशपांडे यांनी अभाविपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून काम केले आहे.
वॉशिंग्टन येथे यु एन परिषदेत ‘दृष्टीच्या’ अंजली देशपांडे यांचा सहभाग ▪️
RELATED ARTICLES


