पुणे, दि. १७: ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून’ येथे प्रवेशासाठी ७ जून २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र स्वीकारण्यास कमांडंट आर.आय. एम. सी डेहराडून यांनी २० एप्रिलपर्यंतची मुदतवाढ दिली आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी कळविले आहे.
००००


