Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्ह्यात मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण सुरू; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन*

जिल्ह्यात मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण सुरू; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन*

 

पुणे, दि. १७ (जिमाका, वृत्तसेवा): जिल्ह्यात येत्या काही दिवसांत मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून, त्याअंतर्गत २००२ सालच्या मतदार यादीतील नावांची पडताळणी व मॅपिंग प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

शिरूर विधानसभा मतदारसंघ (क्र. १९८) मध्ये आतापर्यंत सुमारे ३३.७५ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदारांचे मॅपिंग लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नागरिकांच्या घरी भेट देत असून, त्यांना आवश्यक माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

नागरिकांनी स्वतःचे २००२ सालच्या मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र व मतदारसंघ याबाबत माहिती ठेवून BLO यांना सहकार्य करावे. अन्यथा, आवश्यक माहिती अभावी नाव वगळले जावू शकते.

*नाव कसे शोधायचे?*

२००२ च्या मतदार यादीत नाव शोधण्यासाठी Voter.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. “Search Your Name in Last SIR” हा पर्याय निवडावा. त्यामध्ये आपले नाव शोधावे.संबंधित विधानसभा मतदारसंघ क्रमांक, मतदार यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक नोंद करून ठेवावा.

*२००२ च्या यादीत नाव नसल्यास*

जर संबंधित व्यक्तीचे २००२ साली वय १८ वर्षे पूर्ण झालेले नसेल किंवा त्याचा जन्म त्या वेळेस झाला नसेल, तर

त्या व्यक्तीच्या आई-वडिलांचे २००२ सालच्या मतदार यादीतील नाव शोधणे आवश्यक आहे. त्या वेळी ते कोणत्या शहरात, जिल्ह्यात व मतदारसंघात राहत होते याची माहिती द्यावी. आई-वडिलांच्या नावाच्या आधारे संबंधित व्यक्तीचे मॅपिंग BLO मार्फत करण्यात येईल. आवश्यकतेनुसार वारसनोंद केली जाईल. याशिवाय, नवीन नोंदणीसाठी अर्ज क्रमांक ६ भरावा लागेल.

प्रशासनाने सर्व मतदारांना जागरूक राहून या मोहिमेत सहभाग नोंदवण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी 198 शिरुर विधानसभा मतदार संघ संगीता राजापूरकर यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments