Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी..

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी..

पिंपरी, दि.१९ एप्रिल २०२६ :- बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांनी नागरिकांना स्त्री-पुरुष समानतेबरोबरच एकात्मता, बंधुता, अहिंसा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला,प्रत्येक माणसाला जीवन जगण्याची समान संधी मिळावी त्यात कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये याकरिता सतत कार्यरत असणारे महात्मा बसवेश्वर यांच्या व्यापक विचारसरणीचा वारसा सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्यील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

अभिवादन कार्यक्रमास कर्नाटकातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरणू सलगर यांच्यासह उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

निगडी येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

या कार्यक्रमास आमदार शरणू सलगर, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे,माजी उपमहापौर तथा नगरसदस्या शैलजा मोरे,नगरसदस्य अमित गावडे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, मोरेश्वर भोंडवे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments