Saturday, October 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedआरोग्य जनजागृती व समुपदेशन शिबिर* *सेवा संकल्प अभियानांतर्गत...

आरोग्य जनजागृती व समुपदेशन शिबिर* *सेवा संकल्प अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना आरोग्य, ईएसआयसी सुविधा व व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन*

 

 

पुणे, दि. ९ : कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपणे, विविध आजारांबाबत जनजागृती करणे आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करणे, या उद्देशाने क्लीन सायन्स कंपनीत आरोग्य जनजागृती व समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय प्रशासन अधिकारी, पुणे यांच्या अंतर्गत सेवा दवाखाना, कुरकुंभ यांच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानांतर्गत हे शिबिर घेण्यात आले.

 

वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. रंगदळ, डॉ. तनुजा गवार्ले, डॉ. शुभम मोहोळकर आणि सेवा दवाखाना, कुरकुंभचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले.

 

परिचारिका अंजना सरक यांनी कर्मचाऱ्यांना कार्यस्थळावरील आरोग्याची काळजी, दैनंदिन आरोग्यदायी सवयी, आजारांपासून बचाव आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

सुरक्षिततेसोबतच वैयक्तिक आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) अंतर्गत विमाधारकांना उपलब्ध असलेल्या विविध योजना, वैद्यकीय सुविधा आणि आरोग्यसेवांची माहिती दिली. विमाधारकांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा तसेच आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

 

औषध निर्माता ऋषिकेश कोलसे यांनी व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन केले. तंबाखू, गुटखा, धूम्रपान आणि अन्य व्यसनांमुळे होणारे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम स्पष्ट करत त्यांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.

 

या शिबिराला विमाधारक व कर्मचारी तसेच कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून कार्यस्थळांवर आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे आणि कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments