Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोटककडून देशभरात ट्रकचालकांसाठी आरोग्‍य तपासणी मोहिम ‘सेहत का सफर'चे आयोजन

कोटककडून देशभरात ट्रकचालकांसाठी आरोग्‍य तपासणी मोहिम ‘सेहत का सफर’चे आयोजन

मुंबई, १३ मार्च, २०२४: कोटक महिंद्रा बँकेने (‘केएमबीएल’ / ‘कोटक’) कोटक कर्म उपक्रम ‘सेहत का सफर’च्‍या दुसऱ्या पर्वाला लाँच केले आहे. हा उपक्रम देशभरातील ट्रकचालकांच्‍या शारीरिक आरोग्‍याला प्राधान्‍य देण्‍याप्रती समर्पित आहे.

या उपक्रमांतर्गत कोटक पूरक आरोग्‍य तपासणी शिबिरांचे आयोजन करत आहे, जे विशेषत: या महत्त्वपूर्ण कर्मचारीवर्गासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. ही शिबिरे मोफत वैद्यकीय सल्लामसलत आणि अनेक चाचण्‍या प्रदान करेल, जेथे ‘सेहत का सफर’च्‍या माध्‍यमातून देशभरातील जवळपास ३,००० ट्रकचालकांच्‍या आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍यासंदर्भातील समस्‍यांचे निराकरण करण्‍यात येईल. डोळ्यांची तपासणी, पोश्‍चर इव्‍हॅल्‍यूशनसाठी (पवित्रा मूल्‍यांकन) फिजियोथेरेपीस्‍ट्स/ऑर्थोपेडिक स्‍पेशालिस्‍ट्सकडून तपासणी, ओरल कॅन्‍सरच्‍या सुरूवातीच्‍या तपासण्‍यांसाठी डेण्‍टल चाचण्‍या आणि रक्‍तदाब, रक्‍तातील शर्करेची तपासणी यासह एकूण आरोग्‍य तपासणी अशा सेवा देण्‍यात येतील. मोफत औषधोपचार प्रदान करण्‍यासोबत कोटक ड्रायव्‍हर्सचे आरोग्‍य सुधारण्‍याचा मनसुबा असलेल्‍या सरकारी कल्‍याण योजनांबाबत जनजागृती सत्रांचे आयोजन करत आहे.

कोटक महिंद्रा बँकेच्‍या लॉजिस्टिक्‍स अँड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरचे अध्‍यक्ष अमित मोहन म्‍हणाले, “आपल्‍या अर्थव्‍यवस्‍थेमधील अनसंग हिरोज असलेल्‍या ट्रकचालकांना देशभरात निरंतर सामानांची वाहतूक करावी लागते. दुर्दैवाने, त्‍यांच्‍या आव्‍हानात्‍मक कामामुळे त्‍यांना त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे लक्ष देण्‍यास क्‍वचितच वेळ मिळतो. आमच्‍या आरोग्‍य तपासणी शिबिरांचा आरोग्‍यदायी जीवनशैलीचा प्रचार करण्‍याचा आणि या चालकांना आवश्‍यक मार्गदर्शन करण्‍याचा मनसुबा आहे. मागील शिबिरांना मिळालेले यश पाहता आम्‍हाला आशा आहे की ‘सेहत का सफर’ अधिकाधिक ट्रकचालकांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणेल.”

ट्रकचालक सतत परिवहन करत असलेल्‍या ट्रान्‍सपोर्ट हब्‍समध्‍ये जवळपास ३० आरोग्‍य शिबिरांचे आयोजन करण्‍यात येईल. प्रत्‍येक शिबिरामध्‍ये सहा सदस्‍य असतील, ज्‍यामध्‍ये डॉक्‍टर्स४यू मधील डॉक्‍टर्स व नर्सिंग कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. हा उपक्रम नाशिक, मुरादाबाद, कानपूर, रोहतक, फरिदाबाद, बिकानेर, भिलवाडा, जयपूर, जोधपूर, भटिंडा, जालंधर, लुधियाना, चंदिगड, वेलोर, संकारी, कालिकत, हैदराबाद – ऑटो नगर, हुबळी, जोरहाट, धनबाद, भुवनेश्‍वर, पटणा, पुणे, औरंगाबाद, नाशिक, रायपूर, गांधीधाम, इंदौर, ग्‍वाल्‍हेर आणि सुरेंद्रनगर – हलवद या जवळपास ३० शहरांपर्यंत पोहोचण्‍यास सज्‍ज आहे.

‘सेहत का सफर’ उपक्रम वर्ष २०२३ मध्‍ये सुरू झाला. पहिल्‍या पर्वामध्‍ये कोटकने ३० ‘सेहत का सफर’ वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले, ज्‍यांचा देशभरातील जवळपास ३,००० ट्रकचालकांना फायदा झाला.

कोटक कर्म ही कोटक महिंद्रा ग्रुपची कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) ओळख आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments