Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंदू धर्म म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचे सायन्स;हिंदू राष्ट्रासाठी संघटित होण्याचे कालीचरण महाराजांचे आवाहन*...

हिंदू धर्म म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचे सायन्स;हिंदू राष्ट्रासाठी संघटित होण्याचे कालीचरण महाराजांचे आवाहन* *स्वार्थाचा त्याग करून देशकार्यासाठी वेळ द्या- अविनाश भेगडे*

 

 

*चिखलीत प्रथमच भव्य दिव्य ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न!*

 

चिखली (प्रतिनिधी) दिनांक २० एप्रिल २०२६:- हिंदू धर्म वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.धर्म म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचे सायन्स असून हिंदू राष्ट्रासाठी संघटित होण्याचे आवाहन प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या कालीपुत्र कालिचरण महाराज यांनी हिंदू बांधवांना केले.नेवाळे वस्तीतील धर्मरक्षक भुजबळ प्रांगणात पार पडलेल्या विराट हिंदू संमेलनात ते (दि.१९) बोलत होते.या संमेलनाला चिखली आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हरिपाठ व भजनी मंडळे, सर्व महिला बचत गट, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघा सहित हजारो हिंदू बांधव, माता-भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी कालिचरण महाराज म्हणाले की,भारताला ‘हिंदू राष्ट्र’ बनवणे ही काळाची गरज आहे. डाळ-तांदळाच्या भावासाठी रडणारी ‘भिकारचोट’ वृत्ती सोडली पाहिजे. हिंदूंनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन श्रीमंत व्हावे, तरच देश आणि धर्म श्रीमंत होईल.”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८० वर्षांपूर्वीच मुसलमानांच्या निष्ठेवर आणि शरीया कायद्यावर भाष्य केले होते. त्यांचे पुस्तक वाचून त्यांचा भक्त झालो आहे. मुसलमानांची पहिली निष्ठा त्यांच्या धर्माशी आणि जिथे इस्लामिक सत्ता आहे त्या देशाशी असते, हे आंबेडकरांचे विधान आजही तंतोतंत लागू पडते.आपल्याला अर्धेच वाक्य शिकवून नपुंसक बनवण्यात आले आहे.महाभारतातील पूर्ण श्लोक ‘अहिंसा परमो धर्म:, धर्म हिंसा तथैव च’ असा आहे.दुष्टांचा संहार करणे हाच खरा धर्म आहे. श्रीराम, श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शस्त्रास्त्रांचा दाखला देत त्यांनी हिंदू धर्माच्या शौर्याची आठवण करून दिली.

 

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘जिम जिहाद’ यांसारख्या संकटांपासून सावध राहिले पाहिजे. तसेच, हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकून हिंदूंच्याच व्यापाराला प्राधान्य दिले पाहिजे.आपल्या मुलींच्या हातात स्वसंरक्षणासाठी शस्त्रे असावीत.भ्याड मृत्यू पत्करण्यापेक्षा धर्मासाठी योद्धा म्हणून मरा. जर मरायचेच असेल तर नथुराम गोडसे यांच्यासारखे देशद्रोह्याला मारून मरा, जेणेकरून लोक तुमचा उदो-उदो करतील.उपस्थित जनसमुदायाने ‘जय श्री राम’ आणि ‘ओम काली’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.”जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो,” असे मत कालिचरण महाराजांनी व्यक्त केले.

 

सामाजिक पंच परिवर्तनावर बोलतांना अविनाश भेगडे म्हणाले की,“देशावर जेव्हा संकट येईल तेव्हा आपण आपली वैयक्तिक कारणे बाजूला ठेवून सक्रिय होणार का? उंदरांच्या गोष्टीप्रमाणे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याची जबाबदारी टाळून देश मोठा होणार नाही. प्रत्येकाने रोज देशासाठी थोडे तरी काम केले पाहिजे, तरच भारत बलशाली होईल.डॉ हेडगेवारांनी जात-पात विसरून सर्व हिंदूंना एकत्र आणण्यासाठी १९२५ मध्ये संघाची स्थापना केली. “संघाला कोणतेही श्रेय नको आहे. ज्या दिवशी हिंदू समाज स्वतःचे प्रश्न सोडवण्यास सक्षम होईल आणि सुसंघटित होईल, त्या दिवशी संघाचे कार्य पूर्ण होईल. ‘ग्लोबलायझेशन’मुळे आपली कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. मोबाईलचे व्यसन सोडून आठवड्यातून एकदा तरी कुटुंबाने एकत्र बसून संवाद साधला पाहिजे आणि मुलांवर संस्कार केले पाहिजेत.पाण्याचा जपून वापर करणे, वृक्षारोपण करणे आणि ‘सिंगल युज प्लास्टिक’चा त्याग करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भेगडे यांनी केले.

 

भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी दैनंदिन वापरात चिनी वस्तूंचा त्याग करून भारतीय बनावटीच्या (स्वदेशी) वस्तूंचा वापर करावा. सण आणि परंपरा भारतीय पद्धतीने साजरे करून धर्माचे पालन कृतीतून झाले पाहिजे.समाजात कोणताही भेदभाव न ठेवता ‘हिंदू’ म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे.जातीचे ‘भूत’ जोपर्यंत गाडले जाणार नाही, तोपर्यंत देश एकसंघ होणार नाही.देशातील भ्रष्टाचार आणि अनैतिकतेसोबतच शहरांमध्ये वाढत असलेल्या ‘अर्बन नक्षल’ मानसिकता धोकादायक आहे.वारी किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींपासून हिंदूंनी सावध राहिले पाहिजे.अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी झालेला ५०० वर्षांचा संघर्ष आणि आताचे दर्शन हे आपले सौभाग्य असल्याचे मत भेगडे यांनी व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे संयोजक दत्तात्रय ढोले पाटील हे प्रस्तावना सादर करतांना म्हणाले की, “हे संमेलन म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून आपल्या अस्मितेचा, एकतेचा आणि विजयशक्तीचा जागर आहे. नेवाळे वस्तीची ही पावन भूमी नेहमीच संस्कार आणि धर्मरक्षणासाठी अग्रेसर राहिली आहे. आज आपण सर्व जातीपातीचे भेद आणि भिंती गाडून केवळ ‘हिंदू’ म्हणून येथे एकत्र आलो आहोत, हेच या संमेलनाचे सर्वात मोठे यश आहे.” ‘संघशक्ती कलौयुगे’ या संस्कृत वचनाचा आधार घेत त्यांनी कलियुगात संघटन हीच सर्वोच्च शक्ती असल्याचे अधोरेखित केले.

 

सुरुवातीला ढोल ताशाच्या गजरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी कलिचरण महाराज यांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन झाले.यावेळी पारंपारिक युद्ध कला तलवारबाजी व दांड पट्टा मर्दानी खेळ आधी खेळाचे सादरीकरण करण्यात आले.जयश्रीराम या घोषवाक्ये परिसरात दणाणून गेला होता. गोमातेच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मोबाईलच्या टॉर्च आरती वेळी लावल्यामुळे परिसर फुलून गेला होता. कार्यक्रमानंतर उपस्थित हिंदू बांधवांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम सावंत तर आभार अनुपमाताई पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments