पिंपरी, पुणे (दि. १८ डिसेंबर २०२३) विकसित तंत्रज्ञानाचा वापर वास्तु निर्मिती शास्त्रातही मुक्तहस्ते होत आहे. परंतु वातावरणातील बदलांचा परिणाम नैसर्गिक साधन संपत्ती वर होत असून वास्तु निर्मिती करताना पर्यावरण रक्षणाला वास्तू रचनाकारांनी महत्त्व दिले पाहिजे, असे मार्गदर्शन वास्तु विशारद सुरज पवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरच्या (आयआयए) पिंपरी चिंचवड शाखेने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या सहकार्याने वास्तु विशारद सुरज पवार यांचा परिसंवाद ‘संकल्पना स्वररंग’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, आय. आय. ए. चे अध्यक्ष पारस नेत्रेगावकर, आयआयएचे उपाध्यक्ष वास्तु विशारद ॠषिकेश देवरे, सचिव उमेश नामदे, सहसचिव अजिंक्य निफाडकर आदी उपस्थित होते.
सुरज पवार यांनी नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून हवामान पुरक अशा वास्तु रचना केल्या आहेत. त्यांनी हाताने तयार केलेल्या प्रतिकृतींचा उपयोग केला असून ही नवी संकल्पना युवा वास्तु रचनाकारांसाठी फार प्रेरणादायी ठरेल, असे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
सूत्रसंचालन रक्षंदा पलांडे, आभार ऋषिकेश देवरे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शिरीष मोरे सहाय्यक प्राध्यापक ॠतुषा लड्डा, निकिता गायकवाड, आयआयएचे सदस्य मदुरा बुटाला, माणिक बुचडे, महेश ठाकूर, संदीप हिंगे, कृष्णा पाटील यांनी केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या
वास्तुनिर्मितीत पर्यावरण रक्षणाला महत्त्व द्यावे – सुरज पवार एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये ‘संकल्पना स्वररंग’ परिसंवाद
Share with
Tagged in :