पुणे, दि. २२ : राज्य उत्पादन शुल्क विभाग, तळेगाव दाभाडे (पुणे) व महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या अंतर्गत एकूण ०२ ट्रक कंटेनर, २० चारचाकी वाहने व २५ दुचाकी वाहने यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी उत्तम आव्हाड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे पुणे येथे संपर्क साधावा.
00000


