Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अर्ज त्रुटी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत*...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अर्ज त्रुटी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत*  

 

 

पुणे, दि. २३ (जिमाका, वृत्तसेवा): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये आढळलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे. सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून त्रुटी असलेले अर्ज ‘sent back’ करून विद्यार्थ्यांना आवश्यक सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र, दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंत अर्जातील त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज कायमस्वरूपी नाकारले जाणार असून, त्याबाबत पुढील कोणतीही कार्यवाही समाज कल्याण विभागामार्फत केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

त्यामुळे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ३० एप्रिल २०२६ पूर्वी आपल्या अर्जातील त्रुटी तात्काळ दुरुस्त करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी, माधुरी वाघमोडे यांनी केले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments