Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमामाच्या गावी येताच हरखले चिमुकले वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर...

मामाच्या गावी येताच हरखले चिमुकले वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : दरवर्षीप्रमाणे मामाच्या गावाला जाण्याची ओढ आणि एकदा का मामाच्या गावी पोहोचलो की आनंदाला आलेले उधाण… नाचत-गात, हसत-खेळत व्यक्त होणारा हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. यंदाही मामाच्या गावी आलेल्या भाचे मंडळींचे जंगी स्वागत करण्यात आले. बँडच्या गजरात नाचत, रंगबेरंगी टोप्या घातलेल्या मुलांचा उत्साह, बग्गी, उंट, घोडयाची रपेट मारत वंचित आणि विशेष मुलांचा स्वागताचा सोहळा रंगला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह आणि समाधान या सोहळ्याला अधिकच खास बनवून गेला. मामाच्या गावी झालेल्या या जंगी स्वागताने प्रत्येकाच्या मनात आनंदाची सुंदर आठवण कोरली गेली.

 

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व पुणेकरांच्या सहभागाने मामाच्या गावची सफर हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. मामाच्या गावची सफर या उपक्रमाचे यंदा २७ वे वर्ष आहे. पुढील दोन दिवस भरगच्च उपक्रमांचे आयोजन भाचे मंडळींसाठी करण्यात आले आहे. यावेळी आमदार हेमंत रासने, नगरसेवक अजय खेडेकर, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, सिद्धी शिळीमकर, सई थोपटे, स्नेहा माळवदे, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र काकडे,ॲड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, विश्वास भोर, पीयुष शाह, कुमार रेणुसे, सागर घम, राजू कांबळे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष नितीन होले, अमर लांडे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे, सचिन ससाने, मित नानावटी, नमन कांबळे, स्वामी महाले यावेळी उपस्थित होते.

 

 

मामाच्या गावची सफर या उपक्रमासोबतच दृष्टीहिन असलेल्या जोडप्यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन देखील केले जाते. लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था यांच्या समवेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

 

दिनांक २४ एप्रिल रोजी संध्याकाळी लुई ब्रेल अंध अपंग संस्थेच्या वतीने ऑर्केस्ट्राचा विशेष कार्यक्रम होणार आहे यासोबतच मेहंदीचा कार्यक्रम देखील होणार आहे. दिनांक २५ एप्रिल रोजी भाचे मंडळींचा निरोप समारंभ होणार आहे. दिनांक २६ एप्रिल रोजी अंध भगिनींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. विवाह सोहळ्यापूर्वी साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम होणार आहे. विवाहाचे धार्मिक विधी दुपारी २ वाजता तर ४.३० वाजता नवरदेवाची वरात निघणार आहे. मुख्य विवाह सोहळा सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.

 

शिरीष मोहिते म्हणाले, अनाथ आश्रमातील मुले-मुली मामाच्या गावच्या सफरीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी आतुरतेने वाट पहातात. दोन ते तीन दिवस भाचे मंडळी मुक्कामी असतात. अनाथ आणि विशेष मुलांना मामाच्या गावी येऊन सुट्टीमध्ये मजा करता यावी, यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते. माहेर – भीमा कोरेगाव, संस्कार बाल आश्रम राशीन, स्नेहप्रेम सामाजिक प्रतिष्ठान कर्जत नगर, संतुलन निवासी पाषाण, बचपन वर्ल्ड फोरम हडपसर, आपले घर डोणजे संस्थातील २२५ पेक्षा अधिक मुले उपक्रमात सहभागी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments