Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे महापालिकेत भाजपला पहिला झटका; वादग्रस्त नगरसेवक महादेव उर्फ डॉक्टर दादा कोद्रे...

पुणे महापालिकेत भाजपला पहिला झटका; वादग्रस्त नगरसेवक महादेव उर्फ डॉक्टर दादा कोद्रे यांचे पद धोक्यात.*

*शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अनिल जालिंदर भांडवलकर केशवनगर यांनी दाखल केलेल्या याचीकेवर पुणे न्यायालयाचा दणका.*

*पुणे दिनांक 24 एप्रिल 2026.*
: पुणे महापालिकेतील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. भारतीय जनता पक्ष च्या तिकिटावर वार्ड क्रमांक 15 (केशवनगर–मांजरी) मधून निवडून आलेले ओबीसी प्रवर्गातील नगरसेवक महादेव उर्फ डॉ. दादा कोद्रे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेत न्यायालयाने कोद्रे यांचे म्हणणे सपशेल फेटाळल्याने त्यांच्या पदावर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. या झटक्यामुळे पुणे महापालिका भाजपामध्ये खळबळ उडाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते व शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे युवक नेते, पत्रकार अनिल जालिंदर भांडवलकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. कोद्रे यांनी निवडणूक अर्जामध्ये त्यांच्या मालमत्ता व इमारतीची अपूर्ण माहिती देत निवडणूक आयोग व प्रशासनाची दिशाभूल फसवणूक केल्याचा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणातील प्राथमिक सुनावणीत 23 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाने महादेव उर्फ डॉक्टर दादा कोद्रे यांचे प्रतिवेदन नामंजूर करत मोठा झटका दिल्याने प्रभाग क्रमांक 15 केशवनगर मध्ये देखील खळबळ उडालेली आहे.
या निर्णयामुळे डॉक्टर दादा उर्फ महादेव कोद्रे यांचे नगरसेवक पदच नव्हे, तर त्यांच्याशी संबंधित सर्व लाभांची पदेही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापुढे जोपर्यंत न्यायालयाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत गोदरे यांना कायदेशीर रित्या कोणत्याही योजनेत किंवा प्रकरणांमध्ये भाग घेता येणार नाही. या न्यायालयीन प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार असल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
*ही याचीका 29/01/2026 रोजी प्रोविजन ऑफ सेक्शन 403 (2) तसेच सेक्शन 16(1) ऑफ एम एम सी नुसार सामाजिक कार्यकर्ते तसेच शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य, व एनयूबीसी पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर यांनी एडवोकेट अगरवाल यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या याचिकेवर 07 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे,*
दरम्यान, याचिकाकर्ते अनिल भांडवलकर यांनी “ही फक्त सुरुवात असून सत्य बाहेर येईल. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, गरज पडल्यास शासन प्रशासनाची फसवणूक करणाऱ्याच्या विरोधात सरकार व निवडणूक आयोगाला मदत म्हणून सत्यमेव जयते साठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढू,” असा इशारा भाडवलकर आणि शेतकरी सघ़टनेने दिला आहे. या घडामोडींमुळे पुणे महापालिका भाजपा गोटात खळबळ उडाली असून मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments