Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिंद्रा अँड महिंद्राच्या पेटंट पोर्टफोलिओमध्ये दशकभरात 20 पटीने वाढ

महिंद्रा अँड महिंद्राच्या पेटंट पोर्टफोलिओमध्ये दशकभरात 20 पटीने वाढ

आर्थिक वर्ष 2016 मध्ये कंपनीकडे फक्त 56 मंजूर पेटंट होते, जे आर्थिक वर्ष 2026 पर्यंत वाढून 1,334 झाले आहेत, ज्‍यामध्‍ये 20 पटींहून अधिक वाढ झाली आहे.

पेटंट अर्जांचे प्रत्यक्ष पेटंट मिळण्यामध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण 8 टक्‍क्‍यांवरून 65 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाले आहे.

एमअँडएमच्‍या वाढत्‍या पेटंट पोर्टफोलिओमधून कंपनीचे नाविन्यपूर्ण संशोधनावर असलेले लक्ष दिसून येते.

मुंबई, एप्रिल 23, 2026: महिंद्रा अँड महिंद्रा (एमअँडएम)ने आरअँडडीमधील (संशोधन व विकास) सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि मेक इन इंडिया उपक्रमाप्रती आपली अढळ बांधिलकी अधोरेखित करत जाहीर केले आहे की, गेल्या एका दशकात कंपनीला मंजूर झालेल्या पेटंटच्या संख्येत 20 पटीने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2016 मध्ये प्रारंभापासून फक्त 56 पेटंट मंजूर होते. ही संख्या आर्थिक वर्ष 2026 मध्ये 1,334 वर पोहोचली आहे.

मार्च 2026 पर्यंत महिंद्राने दाखल केलेल्या एकूण अर्जांची संख्या 2,728 आहे, ज्‍यामधून कंपनीची नाविन्यपूर्ण संशोधन आणि उत्कृष्टतेप्रती असलेली ओढ दिसून येते. एकूण 1,334 मंजूर पेटंटपैकी 60 टक्‍के पेटंट ऑटोमोटिव्ह (वाहन) व्यवसाय संबंधित आहेत, तर 40 टक्‍के पेटंट कृषी व्यवसाय संबंधित आहेत. विशेष म्हणजे, अर्जांचे पेटंटमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण आर्थिक वर्ष 2016 मध्ये 8 टक्‍के होते, ते गेल्या दशकात दाखल केलेल्या अर्जांसाठी आता 65 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाले आहे.

एमअँडएमच्‍या पेटंट पोर्टफोलिओमधील या वाढीमधून कंपनीच्या विस्तारत असलेल्या संशोधन व विकास क्षमता दिसून येतात. या वाढत्या नाविन्यपूर्ण ताकदीमुळे कंपनीला नवनवीन प्रयोग करणे आणि ग्राहकांसाठी तंत्रज्ञानाने समृद्ध अनुभव तयार करणे शक्य झाले आहे. या पेटंट पोर्टफोलिओमध्ये एमअँडएमची उपकंपनी महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडने दाखल केलेल्या अर्जांचाही समावेश आहे.

पेटंट्स व्यतिरिक्त, कंपनीने नाविन्यपूर्ण संशोधनातील उत्कृष्टतेसाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत. फक्त गेल्या एका वर्षातच, एमअँडएमला सर्वोत्कृष्ट पेटंट पोर्टफोलिओसाठी सीआयआय आयपी अवॉर्ड, टॉप 50 इनोव्‍हेटिव्‍ह कंपनी २०२५ असण्‍यासाठी सीआयआय इनोव्‍हेशन अवॉर्ड, उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील भागीदारीसाठी सीआयआय नॅशनल अवॉर्ड, क्वेस्‍टेल आयपी एक्‍सलन्‍स अवॉर्ड आणि सीएमओ एशिया अवॉर्ड्स २०२५ मध्ये विशेष सन्मान मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments