आपल्या ईएसजी पुढाकाराचा एक भाग म्हणून बँक ऑफ बडोदाने BOB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझीटचा शुभारंभ केला असून यातील उत्पन्न हे विशेषकरून पर्यावरणपूरक प्रकल्प/क्षेत्रांसाठी राखून ठेवण्यात येईल
मुंबई: मार्च 13, 2024: बँक ऑफ बडोदा (बँक), या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने BOB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझीट अर्थात पर्यावरणपूरक मुदत ठेवीचा शुभारंभ केल्याचे जाहीर केले. पात्र असलेल्या पर्यावरणपूरक प्रकल्पांना आणि क्षेत्रांना आर्थिक मदत देऊ करण्यासाठी ठेवींमध्ये वाढ करणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे.
BOB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझीटच्या माध्यमातून ठेवीदारांना विविध मुदतींवर आकर्षक व्याज दर मिळवण्याची आणि भारताला हरित तसेच टिकाऊ अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्याची संधी मिळते. बँकेकडून वार्षिक 7.15% व्याज दर देण्यात येत आहे. सामान्य नागरिक/निवासी भारतीय, एनआरआय आणि उच्च निव्वळ आय असलेले वैयक्तिक (एचएनआय) गुंतवणूकदार हे BOB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझीट योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पात्र आहेत.
BOB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझीट योजना: मुदत आणि व्याज दर
कालावधी
रक्कम
रु 5,000 ते रु 2 कोटींहून खाली
bob अर्थ ग्रीन डिपॉझीट्स
(% दरसाल)
1 वर्ष म्हणजे
12 महिने
6.75
1.5 वर्ष म्हणजे
18 महिने
6.75
777 दिवस
7.15
1111 दिवस
6.40
1717 दिवस
6.40
2201 दिवस
6.40
बँक ऑफ बडोदाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. देबदत्त चंद म्हणाले, “जोखीम व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणावरील परिणाम या संदर्भातील आमच्या दृष्टीकोनासोबतच बँकेने आपल्या कामकाजात टिकाऊपणा अंतर्भूत करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. BOB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझीट योजनेच्या शुभारंभामुळे गुंतवणूकदारांना स्थिर तसेच सुरक्षित आर्थिक परतावा आणि पृथ्वी हिरवीगार करण्यासाठी हातभार लावण्याची संधी, असा दुहेरी लाभ मिळणार आहे. भारतातील एक आघाडीची बँक या नात्याने, बँक ऑफ बडोदा त्यांच्या ईएसजी उपक्रमाला चालना देण्यासाठी आणि हरित वित्तपुरवठा पोर्टफोलिओमध्ये वाढ करण्यासाठी वचनबद्ध आहे.”
BOB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझीट योजनेअंतर्गत, बँक ऑफ बडोदाने काही नाविन्यपूर्ण मुदत कालावधी सादर केले असून ते पृथ्वीवरील वातावरण आणि टिकाऊपणाची आठवण करून देतात. उदाहरणार्थ, 1.5 वर्षांचा कालवधी – जागतिक तापमानात पूर्व औद्योगिक पातळीमध्ये 1.5 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याची आठवण करून देतो आणि 1717 दिवसांचा कालावधी – संयुक्त राष्ट्रांच्या 17 शाश्वत विकास उद्दिष्टांवर दुपटीने भर देतो.
BOB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझीट योजनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेला निधी हा अक्षय उर्जा, स्वच्छ परिवहन, टिकाऊ पाणी आणि कचरा व्यवस्थापन, उर्जा कार्यक्षमता, वातावरणात अनुकूलन बदल, प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण, हरित इमारती, जैविक वैविध्याचे संरक्षण अशा पात्र हरित प्रकल्प/क्षेत्रांसाठी वापरण्यात येईल.
बँकेचे वर्तमानातील आणि नवे ग्राहक बँकेच्या भारतातील कोणत्याही शाखेमधून ग्रीन डिपॉझीट सुरू करू शकतात.
मागील वर्षी बँक ऑफ बडोदाचा 116 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला, यावर्षी बँकेने “BOB अर्थ” नावातर्गत अनेक हरित उपक्रमांची सुरुवात करत आपल्या आगामी पिढ्यांसाठी निसर्गदत्त भेटवस्तूंचे रक्षण आणि जतन करण्याची वचनबद्धता आणि जबाबदारीची दर्शवाली आहे. BOB अर्थ ग्रीन डिपॉझीटचा शुभारंभ म्हणजे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.


