Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorized*पनवेल मनपाच्या वतीने कलावंतांसाठी* *खारघर, कळंबोली व पनवेल येथे* ...

*पनवेल मनपाच्या वतीने कलावंतांसाठी* *खारघर, कळंबोली व पनवेल येथे* *अभिनय प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन* *शिक्षक- प्राध्यापकांसाठी विशेष बॅच*

पनवेल, दि.26 :- पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 मे ते 19 मे असे नऊ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. यात कलावंत शिक्षक- प्राध्यापकांसाठी विशेष बॅचचे नियोजन करण्यात आले आहे.
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात नाट्य संस्कृती चळवळीस अधिक चालना मिळावी, कलावंतांना मोठे व्यासपीठ मिळावे व सांस्कृतिक उपक्रम वाढावेत या करिता कलावंतांना अभिनयाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्याकरिता महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.
*उच्चस्तरीय प्रशिक्षण *
युवा गटासाठी सकाळी 9 ते 12 व प्रौढ गटासाठी दुपारी 2 ते 5 अशी वेळा असतील. सर्व कलावंतांची चर्चेअंती यात बदल केला जाईल. त्याचप्रमाणे पनवेल आणि खारघर येथे एक बॅच ही उच्चस्तरीय अभिनय प्रशिक्षणासाठी गतवर्षीच्या प्रशिक्षणापेक्षा अधिक वरिष्ठस्तरीय प्रशिक्षण मिळावे यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.एक विशेष बॅच शिक्षक प्राध्यापकांसाठी असेल. शाळा स्नेहसंमेलन विविध उपक्रम शिवजयंती, भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंती त्याचप्रमाणे आपले राष्ट्रीय सण, उत्सव यात पनवेल मनपा परिसरातील विविध शाळा सहभागी होतात. या शाळांमधील मुलांना अभिनय नाट्य विषयक प्रशिक्षण आवश्यक आहे त्याकरता संबंधित शाळेतील शिक्षकांना अधिक प्रशिक्षित केले तर त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. पनवेल, कळंबोली व खारघर येथे कलावंतांसाठी हे शिबिर मोफत आहे.
* प्रत्येक केंद्रावर दोन गट*
अभिनय प्रशिक्षण शिबीरासाठी प्रत्येक सेंटरवर दोन गट निश्चित करण्यात आले आहेत. यात पहिला गट विभाग म्हणजे वय वर्षे 8 ते 16 हा युवा गट व प्रौढ गट म्हणजे 17 ते 65 वयांपर्यंत कलावंतांना यात सहभाग घेता येईल. हे शिबीर मोफत आहे . संख्या मर्यादेमुळे प्रथम येणाऱ्या 30-30 नाट्यकर्मींनाच या शिबिरासाठी प्रवेश दिला जाईल.
नाट्य, सिने क्षेत्रातील मान्यवरांकडून शिबीरात मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शेवटी सर्वांचे सादरीकरण होईल. सर्व शिबीरांर्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी आपली नाव नोंदणी *दिनांक 5 मे 2026* पर्यंत करावी.असे आवाहन पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्यावतीने करण्यात येत आहे.
*संपर्क*
शिबीरात सहभागी होण्यासाठी संबंधितांनी पुढील क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क करावा.
1.शामनाथ पुंडे- प्रमुख कार्यवाह- अ.भा.मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा.
मो.नं : 9821758147
2. श्रीमती स्मिता गांधी,सह कार्यवाह- अ.भा.म.नाट्य परिषद, पनवेल शाखा.
मो.नं. 9323489693
3. सौ. वर्षा कुलकर्णी – जनसंपर्क अधिकारी
मो.नं. 7715815127

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments