Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे आयकॉन २०२६’ परिषदेत आंतरराष्ट्रीय नेत्रतज्ज्ञांची उपस्थिती; डोळ्यांच्या पडद्यावरील अत्याधुनिक उपचारांबाबत चर्चासत्राचे...

पुणे आयकॉन २०२६’ परिषदेत आंतरराष्ट्रीय नेत्रतज्ज्ञांची उपस्थिती; डोळ्यांच्या पडद्यावरील अत्याधुनिक उपचारांबाबत चर्चासत्राचे आयोजन*

– एनआयओ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्यावतीने आयोजित परिषदेत ५०० हून अधिक तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला.
पुणे, २७ एप्रिल २०२६ – भारतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि नामांकित रुग्णालयांपैकी एक असलेल्या एनआयओ सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलने नुकतेच ‘पुणे आयकॉन २०२६ – द रेटिना कॉन्क्लेव्ह’या वार्षिक परिषदेचे आयोजन केले होते. पुणे ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय शिखर परिषदेत देश-विदेशातील नामवंत नेत्रतज्ज्ञांनी सहभाग नोंदवला होता. डोळ्यांच्या पडद्याशी संबंधित उपचारपद्धतींमधील प्रगत उपचारपद्धती आणि नेत्रविज्ञानातील नवनवीन संशोधनावर लक्ष केंद्रित करणे, हा या परिषदेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमात बोलताना एनआयओ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. आदित्य केळकर यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “गेल्या दोन दशकांपासून ‘पुणे आयकॉन’ ही परिषद नेत्रविज्ञानाच्या क्षेत्रातील जागतिक ज्ञान, अनुभव आणि नवनवीन संशोधनाच्या देवाणघेवाणीसठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरली आहे. या वर्षीचे संमेलन आमचे जागतिक स्तरावरील सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच पुराव्यावर आधारित उपचार पद्धतींच्या माध्यमातून डोळ्यांच्या पडद्याच्या उपचारांमध्ये प्रगती साधण्याची वचनबद्धता दर्शवते. कार्यक्रमातील चर्चा, शोधनिबंध, सामायिक माहिती ही नेत्रआरोग्य क्षेत्राचे भविष्य घडवण्यात आणि रुग्णांना अधिक प्रगत सेवा देण्यासाठी अत्यंत मोलाची ठरेल, हा आमचा विश्वास आहे.”
एनआयओ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. जाई केळकर यांनी आधुनिक नेत्रवैद्यकीय क्षेत्रातील सर्वांगीण दृष्टीकोनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “खरे शिक्षण हे नेहमी प्रत्यक्ष कामातील आव्हानांमधूनच मिळते, हे अनेक वर्षांच्या नेत्रविज्ञानातील अनुभवातून स्पष्ट झाले आहे. डोळ्यांच्या पडद्याशी संबंधित आजारांवर उपचार करताना अनेकदा गुंतागुंतीचे निर्णय घ्यावे लागतात. काळानुसार उपचारपद्धतीही बदलावी लागते. याच कारणास्तव, आम्ही अनेक वर्षांपासून ‘पुणे आयकॉन’सारखी व्यासपीठे विकसित करत आहोत. या व्यासपीठाच्या माध्यमातून रुग्णांच्या केसेससंबंधित तज्ज्ञांचे विचार, क्लिनिकल अनुभवांच्या देवाणघेवाणीतून या आव्हानांवर चर्चा करता येईल. या परिषदेचे यश पाहता ‘ज्ञान’ हे पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून, प्रत्यक्ष व्यवहारातून अनुभवांवर आधारित असल्याचे सिद्ध होते. यातून मिळणारे निष्कर्ष दैनंदिन वैद्यकीय उपचारांत लागू करता येतात. हीच या परिषदेची खरी उपलब्धी आहे.”
या दोन दिवसीय परिषदेत नामांकित नेत्रतज्ज्ञ, डोळ्यांच्या पडद्याचे नेत्रतज्ज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांनीही सहभाग नोंदवला. यावेळी डोळ्याच्या पडद्याबाबतीतील आगामी उपचारांच्या दिशेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. डोळा ही शरारीताल अत्यंत गुंतागुंतीची रचना समजली जाते. डोळ्यांतील पडदा हा सर्वाधिक संवेदनशील भाग आणि महत्त्वाचा भाग असल्याने तज्ज्ञांनी या विषयावरच लक्ष केंद्रित केले. या परिषदेत मास्टरक्लासेसचेही आयोजन करण्यात आले होते. यासह तज्ज्ञांची चर्चासत्रे, प्रत्यक्ष रुग्णांच्या केसेसवर आधारित अभ्यास सादर करण्यात आले. विट्रेओरेटिनल शस्त्रक्रियेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करणा-या व्हिडिओ क्लिप्सचा समावेश असलेल्या वैज्ञानिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. परिषदेत उपस्थित सहभागींना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेतील नवनवीन माहिती आणि अत्याधुनिक पद्दतींबाबत माहिती घेण्याची संधी मिळाली.
‘पुणे आयकॉन’मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञांची उपस्थिती हेच परिषदेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले. सिंगापूर येथील आय सेंटरचे डॉ. गॅविन टॅन, अबु धाबी येथील क्लीव्हलँड क्लिनिकचे डॉ. अनिरुद्ध अग्रवाल आणि अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे डॉ. पृथ्वी मृत्यूंजय यांनी या परिषेदतील उपस्थितांना मार्गदर्शन केले. डोळ्यांच्या पडद्याशी संबंधित गुंतागुंतीचे आजार, इमेजिंग बायोमार्कर्स, मधुमेहामुळे डोळ्यांना येणारी सूज आणि उपचारांच्या बदलत्या पद्धती या विषयांवर तपशीलवार माहिती दिली. तज्ज्ञांनी आपापले अनुभव कथन केले. यामुळे स्थानिक डॉक्टरांना डोळ्यांच्या पडद्याशी संबंधित उपचारांमधील आंतरराष्ट्रीय मानके आणि नवीन प्रवाहांची सविस्तर माहिती मिळाली.
या परिषदेतील महत्त्वाच्या सत्रांमध्ये डोळ्यांची जळजळ, मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे आजार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली. नेत्रविज्ञानात क्रांतिकारी बदल ठरलेलेल्या अनेक मुद्द्यांवर माहिती दिली गेली. प्रत्यक्ष उपचारांदरम्यान अचूक निर्णय घेण्यासाठी तसेच आजाराच्या निदानासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वाढत्या वापराचे महत्त्वदेखील अधोरेखित करण्यात आले. रुग्णांच्या केसेससंबंधित चर्चा, तज्ज्ञांशी संवाद यामुळे सहभागी डॉक्टरांना एकमेकांच्या अनुभवातून शिकता आले. वैद्यकीय क्षेत्रातील बारकावे समजून घेण्याची संधी मिळाली. या चर्चेतून समोर आलेले निष्कर्ष दैनंदिन रुग्णसेवेसाठी मोलाचे ठरतील, असा विश्वास परिषदेच्या आयोजनकर्त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments