पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समाज यांच्यात अद्वैत निर्माण करणे हे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे स्वप्न होते, असे विचार भारतीय किसान संघाचे प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील यांनी मांडले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या कसबा भागाच्या वतीने संघ शताब्दी वर्षानिमित्त धर्माचार्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला कुटुंब प्रबोधन गतीविधीचे प्रांत सहसंयोजक संजय कुलकर्णी व कसबा भाग संघचालक अॅड. प्रशांत यादव उपस्थित होते. कसबा भागातील विविध धर्माचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, मंदिर व मठांचे प्रमुख या परिषदेला उपस्थित होते.
पाटील म्हणाले, मी मोठा नाही संघटना मोठी आहे, देश मोठा आहे असा विचार समाजात रूढ करण्याची जबाबदारी धर्माचार्यांची आहे. समाजातील सज्जनशक्ती एकत्रितपणे समाज संघटित करण्याचे काम करेल व तेच कार्य संघाला अपेक्षित आहे.
कुलकर्णी म्हणाले, कुटुंब समाजाचा मुख्य घटक असून योग्य दृष्टिकोन निर्माण करणारी व्यवस्था म्हणजे कुटुंब आहे. कुटुंब व्यवस्थेच्या वैचारिक भावना बदलायला लागल्या आहेत. समाजाची मानसिकता चुकते आहे. ही घडी पुन्हा बसविण्याचे काम धर्माचार्यांना करायचे आहे.
प्रास्ताविक बाळासाहेब पाटोळे यांनी केले.आभार अॅड. प्रशांत यादव यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीहर्ष सगरे यांनी केले.
संघ-समाज अद्वैत: डॉ. हेडगेवारांचे स्वप्न – चंदन पाटील*
RELATED ARTICLES


