Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized32वी वरिष्ठ राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा * * संजय जैन,...

32वी वरिष्ठ राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा * * संजय जैन, विवेक अळवणी, पुरषोत्तम मरकड, जयंत कुलकर्णी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

*70 वर्षांवरील पुरुष एकेरीत महाराष्ट्राच्या शिवानंद कुंडजेला विजेतेपद
* 65 ते 75 वर्षांवरील महिला दुहेरीत महाराष्ट्राच्या
राजेश्वरी मेहेत्रे व मैथिली सोधी यांना विजेतेपद

पुणे, २७ एप्रिल : पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 32 व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत महाराष्ट्राच्या संजय जैन, विवेक अळवणी, पुरषोत्तम मरकड, जयंत कुलकर्णी, प्रकाश केळकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, दुहेरीत 65 ते 75 वर्षांवरील महिला दुहेरीत महाराष्ट्राच्या राजेश्वरी मेहेत्रे व मैथिली सोधी यांनी, 70 वर्षांवरील पुरुष एकेरीत महाराष्ट्राच्या शिवानंद कुंडजे यांनी विजेतेपद संपादन केले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत 60 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या संजय जैनने पराग जुवेकरचा 3-1(11-05, 06-11, 11-08, 11-07) असा तर, महाराष्ट्राच्या विवेक अळवणीने बंगळुरूच्या देबसीस सहाचा 3-1(11-08, 10-12, 11-07, 11-06) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राच्या पुरषोत्तम मरकड याने नितीन मेहेंदळेचा 3-2(11-04, 11-09, 11-13, 09-11, 11-06) असा कडवा प्रतिकार केला.

65 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या
हरीश साळवी याने चंदीगढच्या जवाहर भंडारीचा 3-0(11-08, 11-01, 13-11) असा सहज पराभव केला. महाराष्ट्राच्या जयंत कुलकर्णी याने उत्तराखंडच्या ललित जोशीचा 3-2(11-06, 11-07, 10-12, 04-11, 15-13) असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

70 वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या शिवानंद कुंडजे याने मध्यप्रदेशच्या प्रमोद सोनीचा 3-1(11-09, 11-05, 07-11, 11-06) असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

दुहेरीत 60 वर्षांवरील महिला गटात अंतिम लढतीत मध्यप्रदेशच्या रुबी कौर व रश्मी सोनी यांनी संध्या पाटवा व संध्या सोमाणी यांचा 3-2(11-09, 07-11, 11-06, 08-11, 11-06) असा पराभव करून विजेतेपद मिळवले. 65 ते 75 वर्षांवरील महिला गटात अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या राजेश्वरी मेहेत्रे हिने मैथिली सोधीच्या साथीत दिल्लीच्या इंदू शर्मा व सुनीता मुदगील यांचा 3-0(11-06, 11-02, 11-09) असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.

निकाल: एकेरी:
60 वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
लक्ष्मणराव ठाकरे(गुजरात) वि.वि.अनुज शर्मा(दिल्ली)3-0(11-07, 11-01, 11-06);
संजय जैन(महाराष्ट्र)वि.वि.पराग जुवेकर(महाराष्ट्र)3-1(11-05, 06-11, 11-08, 11-07);
पुरषोत्तम मरकड(महाराष्ट्र)वि.वि.नितीन मेहेंदळे(महाराष्ट्र)3-2(11-04, 11-09, 11-13, 09-11, 11-06);
विवेक अळवणी(महाराष्ट्र) वि.वि.देबसीस सहा(बेंगळुरू)3-1(11-08, 10-12, 11-07, 11-06)

65 वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
हरीश साळवी(महाराष्ट्र) वि.वि.जवाहर भंडारी(चंदीगढ)3-0(11-08, 11-01, 13-11);
जयंत कुलकर्णी(महाराष्ट्र) वि.वि.ललित जोशी(उत्तराखंड)3-2(11-06, 11-07, 10-12, 04-11, 15-13);
प्रकाश केळकर(महाराष्ट्र) वि.वि.रोहिदास गरुड(कर्नाटक)3-0(11-06, 11-09, 12-10);

70 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
प्रमोद सोनी(मध्यप्रदेश)वि.वि.योगेश देसाई(महाराष्ट्र) 3-1(13-11, 02-11, 11-08, 11-09);
शिवानंद कुंडजे(महाराष्ट्र) वि.वि.पर्सी मेहता(महाराष्ट्र)3-0(11-06, 11-04, 11-07);
अंतिम फेरी: शिवानंद कुंडजे(महाराष्ट्र)वि.वि.प्रमोद सोनी(मध्यप्रदेश)3-1(11-09, 11-05, 07-11, 11-06);

दुहेरी: 60 वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:
रुबी कौर/रश्मी सोनी(मध्यप्रदेश) वि.वि.नीता कुलकर्णी/रोहिणी अलवार(महाराष्ट्र)3-0(11-06, 11-06, 11-04);
संध्या पाटवा/संध्या सोमाणी(मध्यप्रदेश) वि.वि.मनिषा प्रधान/स्वाती आगरकर(महाराष्ट्र)3-0(11-03, 11-06, 11-07);
अंतिम फेरी:
रुबी कौर/रश्मी सोनी(मध्यप्रदेश) वि.वि.संध्या पाटवा/संध्या सोमाणी(मध्यप्रदेश) 3-2(11-09, 07-11, 11-06, 08-11, 11-06);

65 ते 75 वर्षांवरील महिला: अंतिम फेरी:
राजेश्वरी मेहेत्रे/मैथिली सोधी(महाराष्ट्र)वि.वि.इंदू शर्मा/सुनीता मुदगील(दिल्ली) 3-0(11-06, 11-02, 11-09);

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments