Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedकिर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी’तर्फे गेल्या वर्षीचा आर्थिक निकाल जाहीर

किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी’तर्फे गेल्या वर्षीचा आर्थिक निकाल जाहीर

ü कंपनीचे २०२५-२६ या आर्थिक वर्षातील (एफवाय२६) एकूण उत्पन्न १,७८६ कोटी रुपये, २०२४-२५ या आर्थिक वर्षात (एफवाय२५) एकूण उत्पन्न होते १,६५१ कोटी रुपयांचे.

ü कंपनीला ‘एफवाय-२६’मध्ये करपूर्व नफा (पीबीटी) झाला ३५६ कोटी रुपयांचा, ‘एफवाय२५’मध्ये तो होता २८४ कोटी रुपये; वर्षागणिक २५ टक्के वाढ

ü कंपनीतर्फे प्रति शेअर ८.५० रुपये (४२५ टक्के) अंतिम लाभांश जाहीर; त्यामुळे २ रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरसाठी वर्षाचा एकूण लाभांश झाला ६०० टक्के.

पुणे, २७ एप्रिल २०२६ : एअर आणि गॅस कॉम्प्रेशन, तसेच रेफ्रिजरेशन व्यवसायातील भारतातील एक महत्त्वाची कंपनी असलेल्या किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लि. (केपीसीएल) (बीएसई : ५०५२८३, एनएसई : KIRLPNU) हिने आज २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले.

या निकालांवर भाष्य करताना, ‘केपीसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक अमन किर्लोस्कर म्हणाले, “गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या भक्कम पायावर आम्ही ही आणखी एकदा उत्कृष्ट आर्थिक कामगिरी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत काही अनिश्चितता असली तरी, येत्या आर्थिक वर्षांतही आमची ही वाढ कायम राहील, असा आम्हाला विश्वास आहे.”

कंपनीच्या लाभांश धोरणानुसार, संचालक मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी एकूण ६०० टक्के लाभांश जाहीर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये प्रति शेअर ८.५० रुपये (४२५ टक्के) अंतिम लाभांशाचा समावेश असून तो भागधारकांच्या मंजुरीवर अवलंबून आहे. यापूर्वी प्रति शेअर ३.५० रुपये (१७५ टक्के) अंतरिम लाभांश देण्यात आला होता. कंपनीच्या इतिहासातील हा सर्वाधिक लाभांश ठरला आहे.

तसेच, संचालक मंडळाने २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचे १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्समध्ये विभाजन (सब-डिव्हिजन) करण्यासही मंजुरी दिली आहे. यासाठी अर्थात भागधारकांची मंजुरी आवश्यक आहे.

दि. १ एप्रिल २०२६ रोजी कंपनीकडे सुमारे १,८६३ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स होत्या. वर्षाच्या सुरुवातीपेक्षा हे प्रमाण १५ टक्क्यांनी अधिक आहे (१ एप्रिल २०२५ रोजी १,६२४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स होत्या). आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये कंपनीला २,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त ऑर्डर्स मिळाल्या असून, ही कंपनीच्या इतिहासातील ऑर्डर्सची सर्वात मोठी आकडेवारी आहे.

कंपनीच्या महसुलात कॉम्प्रेशन व्यवसायाचा सुमारे ९३.४ टक्के वाटा असून, हाच कंपनीचा मुख्य व्यवसाय विभाग आहे.

गेल्या वर्षभरात कंपनीने विक्रमी ५७ आयपी (बौद्धिक मालमत्ता) नोंदविल्या. त्यामुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत कंपनीकडे एकूण १२८ आयपी झाल्या आहेत.

गेल्या चौथ्या तिमाहीतील (क्यू-४) स्वतंत्र आर्थिक कामगिरीचा आढावा

• ‘एफवाय२६’मधील ‘क्यू-४’ या कालावधीत (चौथ्या तिमाहीत) कंपनीला निव्वळ कामकाजातून ७०६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षाच्या याच चौथ्या तिमाहीत ५८३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते; म्हणजे २१ टक्के वाढ.

• ‘क्यू-४ एफवाय२६’मध्ये कंपनीला मिळालेले एकूण उत्पन्न ७१२ कोटी रुपयांचे आहे; ‘क्यू-४ एफवाय२५’मध्ये ते होते ५८८ कोटी रुपये.

• ‘क्यू-४ एफवाय२६’मध्ये एबिटा झाला २७ टक्क्यांचा (१९२ कोटी रुपये); ‘क्यू-४ एफवाय२५’मध्ये तो होता १९.२ टक्के (११५ कोटी रुपये).

• ‘क्यू-४ एफवाय२६’मध्ये करपूर्व नफा (पीबीटी) झाला १८४ कोटी रुपयांचा. ‘क्यू-४ एफवाय२५’मध्ये तो होता १०९ कोटी रुपये; म्हणजे वर्षागणिक ७९ टक्क्यांची वाढ.

• ‘क्यू-४ एफवाय२६’मध्ये निव्वळ नफा (पीएटी) झाला १४४ कोटी रुपयांचा. ‘क्यू-४ एफवाय२५’मध्ये तो होता ८१ कोटी रुपये; वर्षागणिक ७८ टक्क्यांची वाढ.

• ‘क्यू-४ एफवाय२६’मध्ये बेसिक ईपीएस प्रति शेअर आहे २२.१७ रुपये. ‘क्यू-४ एफवाय२५’मध्ये तो होता प्रति शेअर १२.४४ रुपयांचा.

गेल्या आर्थिक वर्षातील (एफवाय२६) स्वतंत्र आर्थिक कामगिरीचा आढावा

• ‘एफवाय२६’मध्ये कंपनीला निव्वळ कामकाजातून मिळाले १७५९ कोटी रुपयांचे उत्पन्न. ‘एफवाय२५’मध्ये हे उत्पन्न होते १६२९ कोटी रुपयांचे; म्हणजे सुमारे ८ टक्क्यांची वाढ

• यानुसार कंपनीचे एकूण उत्पन्न ‘एफवाय२६’मध्ये झाले १,७८६ कोटी रुपये. ‘एफवाय२५’मध्ये ते होते १,६५१ कोटी रुपये.

• एबिटा मार्जिन यंदा झाले एकूण उत्पन्नाच्या २१.७ टक्के इतके, तर ‘एफवाय२५’मध्ये ते होते १९ टक्के.

• ‘एफवाय२६’मध्ये करपूर्व नफा (पीबीटी) ३५६ कोटी रुपये झाला असून, तो एकूण उत्पन्नाच्या २० टक्के आहे. ‘एफवाय२५’मध्ये तो होता २८४ कोटी रुपये (१७ टक्के); म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत नफ्यात झाली २५ टक्के वाढ.

• ‘एफवाय२६’मध्ये करपश्चात (निव्वळ) नफा (पीएटी) झाला २५८ कोटी रुपये. ‘एफवाय२५’मध्ये तो होता २११ कोटी रुपये.

• बेसिक ईपीएस चालू वर्षात प्रति शेअर ३९.८० रुपये झाला. मागील वर्षी तो प्रति शेअर ३२.५६ रुपये होता.

गेल्या चौथ्या तिमाहीतील (क्यू-४) एकत्रित कामगिरीचा आढावा

• ‘क्यू-४ एफवाय२६’मध्ये कामकाजातून उत्पन्न मिळाले ७१२ कोटी रुपयांचे. ‘क्यू-४ एफवाय२५’मध्ये ते होते ५९२ कोटी रुपये; वर्षागणिक २० टक्के वाढ.

• ‘क्यू-४ एफवाय२६’मध्ये एकूण उत्पन्न मिळाले ७१८ कोटी रुपयांचे. ‘क्यू-४ एफवाय२५’मध्ये ते होते ५९७ कोटी रुपये.

• ‘क्यू-४ एफवाय२६’मध्ये एबिटा झाला २७.९ टक्के (१९२ कोटी रुपये), तर ‘क्यू-४ एफवाय२५’मध्ये तो होता १९.३ टक्के (११५ कोटी रुपये).

• ‘क्यू-४ एफवाय२६’मध्ये करपूर्व नफा (पीबीटी) झाला १८३ कोटी रुपयांचा, तर ‘क्यू-४ एफवाय२५’मध्ये तो होता १०८ कोटी रुपयांचा; म्हणजे वर्षागणिक ६९ टक्क्यांची वाढ

• ‘क्यू-४ एफवाय२६’मध्ये करपश्चात (निव्वळ) नफा (पीएटी) झाला १४४ कोटी रुपये. ‘क्यू-४ एफवाय२५’मध्ये तो होता ८० कोटी रुपये; वर्षागणिक ८० टक्के वाढ

• ‘क्यू-४ एफवाय२६’मध्ये बेसिक ईपीएस प्रति शेअर आहे २२.१३ रुपये. ‘क्यू-फोर एफवाय२५’मध्ये तो होता १२.३५ रुपये.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments