Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedनोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांच्या टीमला चार वर्षांच्या मुलाच्या पोटातून टूथपिक...

नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांच्या टीमला चार वर्षांच्या मुलाच्या पोटातून टूथपिक काढण्यात यश

पुणे,29 एप्रिल 2026 : नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील डॉक्टरांच्या टीमने एका चार वर्षांच्या मुलाच्या पोटातून टूथपिक यशस्वीरीत्या काढले.

याबाबत अधिक माहिती देताना नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ.प्रमोद कटारे म्हणाले की, हडपसर परिसरात राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलाला त्याच्या पालकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. सीटी स्कॅन केल्यानंतर पोटाच्या वरच्या भागात (फंडस) टूथपिक अडकली असल्याचे दिसून आले. टूथपिकची दोन्ही टोके पोटाच्या भिंतींमध्ये अडकून फसले होते.

डॉ.कटारे म्हणाले की, अनेकदा पोटात गेलेल्या वस्तू सुरक्षितपणे शरीराबाहेर काढता येतात किंवा बाहेर पडतात,मात्र टूथपिकसारख्या तीक्ष्ण वस्तूंमुळे आतड्यांना छिद्र पडण्याचा किंवा रक्तस्त्राव होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा वस्तू आढळल्यास तातडीने एंडोस्कोपीद्वारे त्यांना बाहेर काढणे आवश्यक असते. या मुलाच्या स्थितीमध्ये एंडोस्कोप घशावाटे पोटात टाकून टूथपिक काढण्यात आले. टुथपिकमुळे झालेल्या छिद्रामुळे काही काळ रक्तस्त्राव झाला, मात्र तो लवकरच थांबला.

डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ.प्रमोद कटारे आणि भूलतज्ज्ञ डॉ.प्रतीक कदम यांचा समावेश होता.उपचारानंतर मुलाला दुसऱ्याच दिवशी घरी सोडण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या उत्तम आहे.

नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील ईमर्जन्सी व ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ.प्रथमेश राऊत म्हणाले की, अशा प्रकारच्या तीक्ष्ण वस्तू शक्यतो लहान मुलांना पोहचता येणार नाही अशा उंचीवर असलेल्या कपाटांमध्ये ठेवाव्यात.तसेच मुलांनी कोणतीही बाहेरील वस्तू गिळल्यास त्वरित त्याला टर्शरी केअर रूग्णालयात घेऊन जाणे आवश्यक आहे.अशा ठिकाणी रूग्णालयाची बहुशाखीय टीमची मदत व जीव वाचवणारे उपचार उपलब्ध होऊ शकतात.

नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. दिविज माने म्हणाले की, हा मुलगा दुसऱ्याच दिवशी पुन्हा दैनंदिन आयुष्य जगायला लागला,याचा आम्हाला अतिशय आनंद आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments