पुणे, १३ मार्च २०२४ : सूथ हेल्थकेअरचा स्वदेशी ब्रँड असलेल्या परी सॅनिटरी पॅड्स ने फेमिनीन हायजिन श्रेणीमध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) प्रमाणपत्र प्राप्त करणारा आघाडीचा ब्रँड म्हणून यश मिळवले आहे. 26 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित भारत टेक्स 2024 कार्यक्रमात या महत्त्वपूर्ण कामगिरीबाबत गौरव करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.भारत टेक्स 2024 दरम्यान बीआयएस स्टॉलवर प्रदर्शित केलेला एकमेव फेमिनीन हायजिन ब्रँड म्हणून, परी सॅनिटरी पॅड्स हा उत्पादनातील नाविन्यता आणि ग्राहकांच्या विश्वासार्हतेचे उदाहरण आहे.
सूथ हेल्थकेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल धारिया म्हणाले की, हा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल आम्हाला परी सॅनिटरी पॅड्सचा खूप अभिमान आहे. बीआयएस प्रमाणन उत्कृष्ट उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी आमच्या अथक प्रयत्नांबरोबरच सुरक्षित आणि विश्वासार्ह हायजिन उत्पादनांसह महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या आमच्या समर्पणाला अधोरेखित करते.


