Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized_सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट (CAWT) ने सुरु केलेले काम अतिशय कौतुकास्पद -...

_सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट (CAWT) ने सुरु केलेले काम अतिशय कौतुकास्पद – रविंद्र चव्हाण

प्रसिद्धीचा काळ सरल्यावर दुर्लक्षित झालेल्या अभिनय क्षेत्रातील जेष्ठ कलाकारांना दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट (CAWT) ने सुरु केलेले काम अतिशय कौतुकास्पद – रविंद्र चव्हाण

 

 

 

अभिनय क्षेत्रातील जेष्ठ कलाकारांसाठी CAWT ला माझी स्वतःची कोकणातील केसरी, सावंतवाडी येथील एक एकर जागा देण्याची माझी तयारी आहे- रविंद्र चव्हाण

 

 

 

जेष्ठ कलाकारांना व सिने क्षेत्रातील कामगारांना सामाजिक जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून त्या सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन – रविंद्र चव्हाण

 

 

 

अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना आपण सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर पाहतो. या क्षेत्रात मिळणारा पैसा व माया यांची चर्चा आपण ऐकतो. पण प्रसिद्धीच्या पडद्याबाहेर गेल्यावर त्या कलाकारांच्या आयुष्यामध्ये किती दुःख असते ते आपल्याला कधीही दिसत नाही. अशा या जेष्ठ कलाकारांसाठी दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख यांसारख्या कलाकारांनी एकत्र येऊन जेष्ठ कलाकारांचे दुःख, त्यांच्या गरजा, त्यांचे आजारपण यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी CAWT सारखा एक मंच तयार केला असून या संस्थेतर्फे केले जाणारे काम अतिशय कौतुकास्पद आहे, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबईत केले.

 

 

 

सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट (CAWT)आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने CAWT च्या स्थापनेत आणि CINTAA – CAWT टॉवरच्या उभारणीत ज्या विश्वस्थ कलाकारांनी आपले अमूल्य योगदान दिले, त्यामध्ये प्रामुख्याने सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख, अमरीश पुरी, अमजद खान, चंद्रशेखर वैद्य, दारासिंह या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी त्या कलाकारांचे फोटो आणि माहिती देणाऱ्या फलकाचे उदघाटन आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळेस ते बोलत होते.

 

 

 

रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले की, अभिनय क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराचा एक प्रसिद्धीचा काळ असतो. तो चांगला काळ ओसरला कि सरत्या काळात त्या कलाकारांकडे कुणी पाहत नाही. त्यांची कुणी चौकशी करत नाहीत. असे जवळपास ९ ते १० हजार कलाकार सध्या अभिनय क्षेत्रात आहेत. अशा कलाकारांचे दैनंदिन जीवन अतिशय हलाखीचे असते. यामध्ये अभिनय क्षेत्रात काम करणारे इतर कामगार यांची संख्या देखील मोठी आहे. याना सामाजिक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती मला CAWT च्या अध्यक्षा प्रीती सप्रू यांनी मला आज दिली. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

 

 

तसेच CAWT ला जेष्ठ कलाकारांकरिता मी कोकणातील केसरी, सावंतवाडी येथील माझी स्वतःची एक एकर जागा देण्यास तयार आहे, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.

 

 

 

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रविंद्र चव्हाण यांच्या सोबत जेष्ठ अभिनेत्री व CAWT च्या अध्यक्षा प्रीती सप्रू, ट्रस्टच्या सचिव अभिनेत्री संभावना सेठ, संस्थेचे खजिनदार अभिनेते दीपक पराशर, बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव, मनोज जोशी, मुकेश ऋषी, आयुब खान, अभिनेत्री कुनिका आणि सिने व टीव्ही क्षेत्रातील अनेक

कलाकार उपस्थित होते.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments