Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिमाचल प्रदेशातील बद्दी येथे विशिष्ट औषधांच्या निर्मितीस वाहिलेले नवे उत्पादन केंद्र सुरू...

हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे विशिष्ट औषधांच्या निर्मितीस वाहिलेले नवे उत्पादन केंद्र सुरू करत यूएसव्‍ही प्रा. लि.ने कार्डिओलॉजी विभागातील आपले अग्रस्थान केले अधिक दृढ

बद्दी, १४ मार्च २०२४: भारतीय बहुराष्ट्रीय आरोग्यसेवा कंपनी यूएसव्ही ने हिमाचल प्रदेश येथील बद्दी येथे विशिष्ट प्रकारच्या औषधनिर्मितीला वाहिलेल्या एका नव्या उत्पादन केंद्राच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. Iqvia च्या २०२३ च्या आकडेवारीनुसार यूएसव्‍ही ही प्रिस्क्रिप्शनच्या निकषान्वये कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांच्या विभागातील आघाडीची कंपनी आहे.
या नव्या समर्पित उत्पादनकेंद्रामुळे उच्च दर्जाचे आणि परवडणाऱ्या दरातील Ecosprin AV औषध अधिक प्रमाणात उपलब्ध होणार आहे व त्यातून कार्डिओलॉजी विभागातील कंपनीचे अग्रस्थान अधिकच भक्कम होणार आहे. या नव्या केंद्रामुळे आता हे उत्पादन रुग्णांसाठी अधिक सोयीच्या पॅकमध्ये उपलब्ध होणार आहे.
आपल्या देशामध्ये, अगदी तरुण व्यक्तींमध्येही कार्डिअॅक घटनांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. अॅस्पिरीन आणि अॅटोर्व्हास्टॅटिन ही औषधे हृदयाचे आरोग्य जपण्यामध्ये आणि रुग्णांना कार्डिअॅक घटनांपासून संरक्षण पुरविण्याच्या कामी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
या उत्पादनकेंद्राचे उद्घाटन यूएसव्‍हीचे डिरेक्टर श्री. देबब्रत भादुरी यांच्या हस्ते व यूएसव्हीच्या चेअरपर्सन श्रीम. लीना गांधी तिवारी व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रशांत तिवारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
“हे आधुनिक उत्पादन केंद्र भारतीयांना एक जीवनरक्षक दर्जेदार ब्रॅण्ड परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देत त्यांच्या हृदयाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने धोरणात्मकरित्या महत्त्वाचे आहे.” प्लान्टच्या उद्घाटनप्रसंगी श्रीम. लीना गांधी तिवारी म्हणाल्या.
मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रशांत तिवारी म्हणाले, “बद्दीमध्ये सुरू झालेले हे नवे युनिट दर्जेदार औषधे पुरवित आयुष्ये वाचविण्याच्या आमच्या उत्तरदायित्वाच्या पूर्तीमध्ये अधिक चांगले योगदान देईल.”
उत्पादनाचा दर्जा आणि परिणामकारकता यांची हमी देण्यासाठी हे उत्पादनकेंद्र उत्पादनप्रक्रियेमध्ये उच्च-तंत्रज्ञानावर चालणाऱ्या यंत्रसामग्रीचा आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते आणि येथील उत्पादनप्रक्रियेची तपासणी स्वयंचलित पद्धतीने होते. रुग्णांना अधिक चांगला परिणाम मिळवून देत हृदयविकार असलेल्या रुग्णांच्या स्वास्थ्याच्या जपणूकीमध्ये प्रभावीपणे योगदान देण्याच्या आमच्या दीर्घकालीन प्रयत्नांची पूर्तता आहे. या प्लान्टमध्ये पुनर्नविकरणीय ऊर्जेचा वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि वृक्षवाटिकेसारख्या अनेक हरित उपक्रमांचा समावेश आहे.
यूएसव्हीचे डिरेक्टर एम एम वेंकटचलम म्हणाले, “हे केंद्र खूपच छाप पाडणारे आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर, स्वयंचलित कार्यपद्धती, गुणवत्ता तपासणी, चाचण्या व निसर्गस्नेही कार्यपद्धतींच्या संदर्भात यात अद्ययावत सुधारणा करण्यात आल्या आहेत. अलीकडच्या वर्षांमध्ये यूएसव्हीने नवीन उत्पादनकेंद्रे, तंत्रज्ञान, कार्यतत्परता आणि क्षमतांच्या बाबतीत अनेक मोठी पावले उचलली आहेत.”
१९६१ साली स्थापन झालेली यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेड ही काही अग्रगण्य भारतीय बहुराष्ट्रीय आरोग्यसेवा कंपन्यांपैकी एक आहे, जिची उत्पादने ६५ हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहेत. भारतामध्ये ही कंपनी तोंडावाटे घ्यायच्या मधुमेहावरील गोळ्या आणि कार्डिओलॉजीच्या क्षेत्रातील आपल्या अग्रस्थानासाठी ओळखली जाते, जिथे प्रिस्क्रिप्शनच्या निकषानुसार ती पहिल्या क्रमांकावर आहे. यूएसव्हीच्या जागतिक स्तरावर उपलब्ध उत्पादनांमध्ये अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल घटक (APIs), जेनेरिक्स, ब्रॅण्डेड जेनेरिक्स, पेप्टाइट्स आणि बायोसिमिलर्स यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments