Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मधुकर दामोदर जोशी यांचा मानपत्र देऊन सन्मान

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मधुकर दामोदर जोशी यांचा मानपत्र देऊन सन्मान

पिंपरी, दि. ५ मे २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मानपत्र देऊन माझा सन्मान केला याचा आनंद आहे, परंतु त्याहून अधिक समाधान या महानगरपालिकेच्या सर्वांगीण प्रगतीकडे पाहून मिळत आहे. आजच्या घडीला अनेक महानगरपालिकांमध्ये कार्यातील समर्पकपणा आणि एकसंधता दिसून येत नाही मात्र येथे ती स्पष्टपणे जाणवते. सुखद आणि सुरक्षित निवास, सुलभ व परिणामकारक प्रवास व्यवस्था, आणि आपुलकीचा सहवास या अपेक्षा एक नागरिक म्हणून सर्वांच्या आहेत. या सर्व बाबींमध्ये येथे होत असलेली प्रगती निश्चितच आशादायक आहे, असे मधुकर दामोदर जोशी म्हणाले.

 

पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात आपल्या कार्यकर्तुत्वाने भर घालणाऱ्या तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांचा महापालिका सर्वसाधारण सभेत सन्मान करण्याचे धोरण ठरविण्यात आले होते. या धोरणानुसार आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पत्रकारिता, कला, साहित्य अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवून शहराच्या नावलौकिकात भर घालणारे मधुकर जोशी यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य मधुरा शिंदे, शितल उर्फ विजय शिंदे, सविता आसवानी, मंदार देशपांडे, सुरेश भोईर तसेच उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

 

मधुकर जोशी म्हणाले, तब्बल ४८ वर्षांनंतर महानगरपालिकेच्या या वातावरणात पुन्हा येण्याचा योग आला, ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाची बाब आहे. या ठिकाणचे वैभव आणि प्रसन्नता केवळ भौतिक रचनेपुरती मर्यादित नसून, ती येथे कार्यरत असलेल्या प्रत्येकाच्या मनातील दृढ विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनातून प्रकर्षाने जाणवते. आजचे हे बदल आणि प्रगती पाहताना विशेष आनंद होत आहे.

 

तसेच महापालिका सभेत बोलताना नगरसदस्यांनी सखोल अभ्यास करूनच मते मांडणे अत्यंत आवश्यक आहे. अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडणीमुळे शहरातील विविध प्रश्न अधिक समजून घेता येतात आणि त्यांचे निराकरण अधिक सुलभ व परिणामकारक पद्धतीने होण्यास मदत होते, असे मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले.

 

दरम्यान, पत्रकारिता, कला, साहित्य अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले मधूकर जोशी हे नगरपालिका असताना नगरसदस्य देखील म्हणून देखील कार्यरत होते.मानपत्राचे वाचन किरण गायकवाड यां

नी केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments