Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिःशुल्क आध्यात्मिक संस्कार शिबिराचे आयोजन दि. १२ ते २५ मे दरम्यान होणार...

निःशुल्क आध्यात्मिक संस्कार शिबिराचे आयोजन दि. १२ ते २५ मे दरम्यान होणार शिबिर ; गीता, प्राणायाम, हरिपाठासह व्यक्तिमत्त्व विकासावर भर

पुणे : लहान मुलांमध्ये सदाचार, सत्प्रवृत्ती आणि आध्यात्मिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने दि. १२ ते २५ मे २०२६ या कालावधीत ‘आध्यात्मिक संस्कार शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. रविवार पेठ कस्तुरे चौकातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट येथे शिबिर होणार आहे. शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक असल्याची माहिती संदीप शिवलिंग पळसे यांनी दिली.

 

हे शिबिर पूर्णपणे निःशुल्क असणार आहे. वय वर्षे ८ ते १६ या वयोगटातील फक्त मुलांना सहभागी होता येणार आहे. शिबिराची वेळ दररोज सकाळी ८ ते दुपारी १२.३० अशी राहणार आहे.

 

या शिबिरामध्ये प्रातःस्मरण, प्राणायाम, श्रीमद्भगवद्गीता अभ्यास, संतांचे अभंग व त्यांचा भावार्थ, विविध स्तोत्रे, हरिपाठ, संत वाङ्मय अभ्यास तसेच विविध खेळ यांचा समावेश असणार आहे. याशिवाय मुलांमध्ये आदर्श व्यक्तिमत्त्व विकास, सदाचार आणि चांगल्या सवयी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

 

संदीप पळसे म्हणाले, आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मुलांवर आध्यात्मिक संस्कार होणे ही काळाची गरज असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना या शिबिरात सहभागी करून घेऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments