बेंगळुरू, ११ मार्च २०२४
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या मुदतठेवींच्या व्याजदरात केले बदल, सर्वसामान्य ग्राहकांना १५ महिन्यांसाठी मिळणार ८.५० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ९.०० टक्के व्याजदर
ठळक वैशिष्ट्ये:
∙ नियमित ग्राहक, NRO आणि NRE ना १५ महिन्यांसाठी ८.५० टक्के इतका सर्वाधिक व्याजदर
∙ ज्येष्ठ नागरिकांना महिन्यांसाठी ९.०० टक्के इतका सर्वाधिक व्याजदर
∙ प्लॅटिना FD ला मिळणार अतिरिक्त ०.२० टक्के व्याजदर आणि हे दर रु. १ कोटींच्या वर व रु. २ कोटींहून कमी रकमेसाठीच लागू
∙ ग्राहकांना आता आमच्या अधिकृत वेबसाइटवरून फिक्स्ड डिपॉझिट उघडता येणार
उज्जीवन SFB चे मॅनेजिंग डायेक्टर आणि चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर श्री. इत्तीरा डेव्हिस म्हणाले, “अल्प मुदतीमध्ये अधिक व्याजदर मिळवू इच्छिणा-या आमच्या ग्राहकांसाठी आमच्या मुदतठेवींवरच्या (FD) सुधारित व्याजदरांची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या सर्वंकष धोरणाशी सुसंगत असेल आणि रिटेल मास मार्केट बँकांच्या क्षेत्रातील आमचे स्थान पुनर्स्थापित करू शकेल असा ठेवींचा अधिक भक्कम आधारभूत साठा निर्माण करणे हे आमचे प्राथमिक उद्दीष्ट आहे.”
७ मार्च २०२४ पासून व्याजदरातील या सुधारणा नियमित ग्राहक, NRO आणि NRE अशा तीन प्रमुख विभागांमध्ये लागू केल्या गेल्या आहेत.
प्लॅटिना FD साठी ०.२० टक्के अतिरिक्त व्याजदर मिळेल व रु. १ कोटीहून अधिक ते रु. २ कोटींहून कमी रकमेच्या ठेवींसाठीच हे दर लागू असणार आहेत.
उज्जीवन SFB मध्ये व्याजदर मिळविण्यासाठी मासिक, त्रैमासिक आणि मुदतपूर्तीनंतर प्राप्ती हे पर्याय उपलब्ध आहेत. करबचत मुदतठेवींसाठी लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा आहे.
व्याजदरांच्या या ताज्या फेरीद्वारे उज्जीवन SFB ने मुदतठेवींवर सर्वाधिक व्याजदर देणा-या बँकांमध्ये स्थान प्राप्त केले आहे.


