पुणे, १२ मार्च २०२४ : केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे शनिवार १६ मार्च २०२४ रोजी दुपारी 2:00 ते दुपारी 4:00 या वेळेत मोफत आयुर्वेद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर केईएम हॉस्पिटल पुणे येथील बानू कोयाजी बिल्डिंग,आयुर्वेद ओपीडी येथे संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये “जीवनशैलीचे आजार” या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असून लठ्ठपणा, थायरॉईड, मधुमेही व्यक्तींसाठी मोफत तपासणी, आहार आणि जीवनशैली या विषयावर विनामूल्य समुपदेशन, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केरळी पारंपारिक औषधांचे वितरण आणि योगाबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे शिबिर विनामूल्य असून पूर्व नोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी संपर्क: 020 6603 7460, 020 26217460
केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे मोफत आयुर्वेद शिबिर
RELATED ARTICLES


