Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाडे तीनशेहून अधिक स्वयंसेवकांना "क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण*

साडे तीनशेहून अधिक स्वयंसेवकांना “क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण*

 

 

पुणे, दि. 20: “ऑफ सिंदूर” पक्षात “ऑफ अभ्यास” अंतर्गत 360 स्वयंसेवकांना “क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण” देण्यात आलेले आहे. याअंतर्गत पाठ्यक्रम पुर्ण करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

 

केंद्रीय गृह विभाग व राज्य गृह विभागाकडून शासनाच्यावतीने उपनियंत्रक नागरी संरक्षण दलामार्फत सेवाभवन, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे येथे आयोजित करण्यात आला.

 

यावेळी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, नगरपरिषद प्रशासन सहाय्यक आयुक्त, प्रताप भोसले, राष्ट्रीय सेवा योजनेचे विंग कमांडर शैलेंद्र मराठे, कर्नल निशाद मंगळुरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.

 

प्रशिक्षण सत्रामध्ये प्रशिक्षणार्थीना प्रत्यक्ष युध्दाच्या वेळेस सीमेवर भुदल, नौदल आणि वायुदलाचे सैनिकी बल कर्तव्य करीत असतातच परंतु, प्रत्यक्ष नागरिकांमध्ये युध्दाच्या परिस्थितीमध्ये नागरी संरक्षण दलांची भूमिका ही फार महत्वाची असते. याच धर्तीवर या प्रशिक्षण देण्यात आलेले असून प्रशिक्षणार्थीनी या प्रशिक्षणाचा उपयोग युध्दाच्या परिस्थितीत करावा. अधिकाधिक नागरिकांना प्रशिक्षण, प्रबोधन देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहायक उपनियंत्रक नागरी संरक्षण अर्जून कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वे दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments