मुंबई, २१ मे २०२६ : भारतातील आघाडीच्या स्टॉक ब्रोकिंग कंपन्यांपैकी आघाडीचे नाव असलेल्या एचडीएफसी सिक्युरिटीजने आपल्या कर्मचा-यांसाठी आवश्यक नियमांची घोषणा केली आहे. हे नियम कंपनीने कर्मचा-यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक पुरोगामी विचारांतून तयार केले आहेत. आपल्या कर्मचा-यांनी वैविध्यपूर्ण लवचिक स्वरुपात त्यांच्या गरजेनुसार कामाचे वातावरण मिळावे, या उद्देशाने कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. हे नवीन नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाशी सुसंगत आहेत. यामुळे कर्मचा-यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, त्यांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात समतोल राखणे सोपे होईल. बदलत्या बाह्य पर्यावरणाशी आणि नवीन व्यावसायिक गरजांशी जुळवून घेण्यासाठी हे नियम फायदेशीर ठरणार आहेत.
या उपक्रमाविषयी बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मानव संसाधन विभागाच्या प्रमुख अधिकारी नीतिका भाटिया म्हणाल्या, ”कार्यालयीन कामकाज पद्धतीला नवी आणि आधुनिक दिशा देणे हे आमचे ध्येय आहे. यात नाविन्यपूर्ण लवचिक व कर्मचा-यांना केंद्रस्थानी ठेवणारी कार्यसंस्कृती उभारणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ही कार्यसंस्कृती आपल्याला उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित करते. आमचे हे हायब्रिड मॉडेल कर्मचा-यांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांच्या कामाची लवचिकता वाढवण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आमची कटिबद्धता दर्शवते.“
याविषयी त्यांनी तपशीलवार माहिती देताना सांगितले की, ”आमचे इंजिनिअरिंग कस्टमर एक्सपिरियन्स आणि डिजिटल अकाऊंट ओपनिंग हे विभाग पूर्णपणे घरातून काम करण्याच्या पद्धतीवर सुरु आहे. यासाठी कर्मचा-यांवर ठराविक ठिकाणी कार्यालयीन कामकाजासाठी येणे बंधनकारक नाही. या आधुनिक पद्धतीमुळे आम्हांला देशभरातील प्रतिभावंतंसोबत जोडण्याची संधी मिळाली आहे. आमच्या कर्मचा-यांना त्यांच्या आवडीनुसार काम करण्याची लवचिकतादेखील मिळाली आहे.“
कर्मचा-यांमध्ये कामाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखला जावा, याकरिता एचडीएफसी सिक्युरिटजने मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीने जाहीर केल्यानुसार, १ एप्रिल २०२६ पासून त्यांच्या सर्व शाखांना दर शनिवारी सुट्टी दिली जाईल. यापूर्वी कंपनीच्या शाखा महिन्यातील पहिल्या, तिस-या आणि पाचव्या शनिवारी कार्यरत असायच्या. आता शनिवारी सुट्टी दिली असली तरीही ग्राहकांच्या सेवेत कोणतीही अडचण येणार नाही, अशी हमी कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे. एचडीएफसीची आठवडाभर चोवीस तास सुरु असलेली डिजिटल सेवा ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध असेल.
कामाच्या लवचिक पद्धतींमधून एचडीएफसी सिक्युरिटीज आपल्या कर्मचा-यांप्रती असलेली काळजी दर्शवते. कंपनीने आपल्या कर्मचा-यांना नेहमीच केंद्रस्थानी ठेवले आहे. कंपनी नवीन संकल्पनांचा स्वीकार करायला आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा द्यायला सदैव तत्पर आहे. ही कार्यपद्धती कंपनीच्या विश्वासाला आणि वचनबद्दतेला बळकटी देते.


