Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedपेप्सिको इंडिया या एनर्जी ड्रिंक्सच्या बाजारातील आघाडीच्या कंपनीकडून स्टिंग® क्लासिक किक या...

पेप्सिको इंडिया या एनर्जी ड्रिंक्सच्या बाजारातील आघाडीच्या कंपनीकडून स्टिंग® क्लासिक किक या नवीन चवीसह श्रेणीचा विस्तार 

 

 

नवीन स्टिंग® क्लासिक किकची फ्लेवरची सळसळत्या ऊर्जेने परिपूर्ण अभिनेता लक्ष्यसोबतच्या जाहिरातीतून ओळख

 

राष्ट्रीय, २५ मे २०२६: पेप्सिको इंडियाचा प्रतिष्ठित एनर्जी ड्रिंक ब्रँड असलेल्या स्टिंग® एनर्जीने स्टिंग® क्लासिक किक फ्लेवर बाजारात आणला आहे. हा एक धाडसी नवीन फ्लेवर असून तो आजच्या युवा पिढीसाठी तयार करण्यात आला आहे. ही पिढी प्रचंड ऊर्जेने सळसळत्या व्यक्तिमत्वाची असून नेहमीच नवनवीन पर्यायांच्या शोधात असते. स्टिंग पोर्टफोलिओचा विस्तार करताना हा नवीन फ्लेवर या ऊर्जेवर आधारित एक धाडसी ओळख आणतो. तसेच ब्रँडचे वैशिष्ट्यपूर्ण मजेदार आणि खोडकर व्यक्तिमत्त्व कायम ठेवतो.

 

या अनावरणासोबतच ‘स्टिंग क्लासिक किक’साठी एक दमदार जाहिरात फिल्म प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यात अभिनेता लक्ष्य एका स्टायलिश रेस्टॉरंटच्या पार्श्वभूमीवर दिसतो. तो आपल्या चातुर्य, आत्मविश्वास आणि स्टिंग® ऊर्जेने सहजपणे एका तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवतो. यातून या फ्लेवरची धाडसी आणि प्रभावी ओळख उत्तम प्रकारे प्रतिबिंबित होते.

 

या फिल्मची सुरुवात एका रेस्टॉरंटमध्ये होते. तिथे दोन धोकादायक पुरुष एका निष्पाप वेटरला मारहाण करताना दिसतात. जवळच बसलेला लक्ष्य सहजपणे हस्तक्षेप करतो आणि त्यांना शांत राहायला सांगतो. त्याला उपहासाने झिडकारत ते दोघे त्याला आपल्या टेबलावरील शेंगदाण्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात. लक्ष्य अत्यंत शांत आणि अविचलपणे स्टिंग® क्लासिक किकचा एक घोट घेतो आणि बाटली टेबलावर आपटतो. या नाट्यमय स्लो-मोशन दृश्यात, शेंगदाणे हवेत उडतात आणि कॅरमच्या स्ट्रायकरप्रमाणे त्या माणसांच्या दिशेने फेकले जातात. ती दोन धमकावणारी माणसे शेंगदाण्यांच्या माराने मागे फेकली जाताता. यावर अभिनेता हसतो आणि फिल्मचा शेवट होतो.

 

या अनावरणाबाबत बोलताना, पेप्सिको इंडियाच्या एनर्जी पोर्टफोलिओ विभागाच्या प्रमुख दीक्षा बजाज म्हणाल्या: “भारतातील एनर्जी ड्रिंक श्रेणीतील एक अग्रगण्य ब्रँड असलेली स्टिंग® एनर्जी नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून या श्रेणीचा विस्तार आणि विकास करत आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय आणि वेगळ्या चवींचा अनुभव मिळतो. स्टिंग® क्लासिक किकच्या अनावरणासह आम्ही एक सुधारित आणि आकर्षक नवीन चव सादर करत आहोत, जी ग्राहकांच्या बदलत्या पसंतीला प्रतिसाद देते आणि त्याच वेळी स्टिंग एनर्जी ज्या उच्च-ऊर्जेच्या अनुभवासाठी ओळखली जाते, त्यालाही जपते. हे अनावरण या श्रेणीचा सतत विकास करण्याच्या आणि ग्राहकांसाठी रोमांचक नवीन उत्पादने आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करते.”

 

या जाहिरातीबाबत बोलताना अभिनेता लक्ष्य म्हणाला: “या मोहिमेचे चित्रीकरण करताना मला त्यातील तीव्र ऊर्जा आणि चित्रपटाने जिवंत केलेली सिनेमॅटिक शैली खूप आवडली. अॅक्शन, विनोद आणि आत्मविश्वासपूर्ण कथाकथन अत्यंत मनोरंजक पद्धतीने एकत्र येतात. त्यामुळे ही जाहिरात स्टायलिश आणि प्रभावी वाटते. या जाहिरातीला वेगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे ती अगदी सहजपणे नवीन स्टिंग क्लासिक किक फ्लेवरचे आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप टिपते. प्रेक्षकांनाही यातून प्रचंड आनंद मिळेल याबाबत मी उत्सुक आहे.”

 

ही मोहीम स्टिंग®च्या तरुण आणि नावीन्यपूर्ण ब्रँड व्हॉइसवर आधारित असून, ‘क्लासिक किक’साठी अधिक ठळक आणि आत्मविश्वासपूर्ण शैली सादर करते. सिनेमॅटिक व्हिज्युअल्स, दमदार कथाकथन आणि स्टायलिश ॲक्शनच्या माध्यमातून ही जाहिरात एक शक्तिशाली आणि वेगळा फ्लेवर शोधणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते.

 

नवीन स्टिंग® क्लासिक किक जाहिरात टीव्ही, डिजिटल, सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर सहयोग आणि आउटडोअर प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ३६०-अंश माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली जाईल.

 

स्टिंग® क्लासिक किक भारतातील आधुनिक आणि पारंपरिक रिटेल दुकानांमध्ये तसेच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर १८० मिलीच्या कॅनमध्ये ३० रूपये किमतीत आणि ३०० मिलीच्या पेट बाटल्यांमध्ये २० रूपये किमतीत उपलब्ध असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments