Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedओडिशा राज्यातील दहा हजार वीज कंत्राटी कामगारांची कपात - महाराष्ट्र राज्यात तीव्र...

ओडिशा राज्यातील दहा हजार वीज कंत्राटी कामगारांची कपात – महाराष्ट्र राज्यात तीव्र निदर्शने

 

 

टाटा पॉवरच्या दहा हजार वीज कंत्राटी कामगार कपाती विरोधात महाराष्ट्रातून ओडिशा आंदोलनाला पाठिंबा

भुवनेश्वर (ओडिशा) येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक वीज कंत्राटी कामगार आंदोलनाला भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ तसेच महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने जाहीर पाठिंबा दर्शवत महाराष्ट्रभर विविध वीज कार्यालयांसमोर निषेध द्वार सभा, व आंदोलनांचे आयोजन केले.

 

ओडिशा राज्यात वीज क्षेत्राच्या खाजगीकरणानंतर टाटा पॉवर व्यवस्थापनाकडून “खर्च कपात” या नावाखाली सुमारे दहा हजार कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात देशभरातील कामगार संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री तथा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी भुवनेश्वर येथील आंदोलनस्थळी बोलताना सांगितले की,

“खाजगीकरणाचा सर्वात मोठा फटका गरीब व कंत्राटी कामगारांना बसत आहे.तरी या मधे मा मुख्यमंत्री ओडीसा यांनी भारतीय मजदूर संघ पदाधिकाऱ्यांसह मिटींग आयोजित करून अनेक वर्षे सेवा देणाऱ्या कामगारांना खर्च कपातीच्या नावाखाली बाहेर काढणे हा अन्याय असून सर्व कामगारांना तात्काळ विनाअट कामावर पुन्हा घ्यावे.” अशी मागणी केली आहे .

 

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी इशारा देताना म्हटले की,

“आज वेळ ओडिशाची आहे, उद्या महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांवरही अशीच वेळ येऊ शकते. एका तरुण आंदोलकाने बेरोजगारीच्या नैराश्यातून आत्महत्या केली सरकार नवीन रोजगार देऊ शकत नसताना आहे तो रोजगार कमी करू लागला तर देशातील तरुणांकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधात वीज क्षेत्रातील सर्व कामगारांनी संघटित राहणे आवश्यक आहे.”

 

संघटनेचे प्रतिनिधी सचिन मेंगाळे व निलेश खरात हे दि.२५ मे २०२६ रोजी भुवनेश्वर येथे पोहोचले असून त्यांनी आंदोलनकर्त्या कामगारांशी चर्चा करून संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.

संघटनेने स्पष्ट केले आहे की, वीज उद्योगातील खाजगीकरणामुळे केवळ कंत्राटीच नव्हे तर कायमस्वरूपी कामगारांचेही रोजगार धोक्यात येत आहेत.त्यामुळे महाराष्ट्रातील विविध वीज कार्यालयांसमोर आयोजित निषेध सभांमध्ये मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.

पुणे येथील महावितरण रास्ता पेठ कार्यालयासमोर आयोजित गेट मिटिंगमध्ये भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्यासह तुकाराम डिंबळे, सुरेश जाधव, उमेश आणेराव व राहुल बोडके व निखिल टेकवडे , मार्गदीप मस्के, योगेश महांगरे यांनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रातील विविध वीज उद्योग कार्यालयांसमोर घेण्यात आलेल्या आंदोलनातून ओडिशातील कामगार कपात तात्काळ रद्द करावी,सर्व कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे तसेच कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

 

*मा संपादक*

*महोदय उपरोक्त वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात सर्व आवृत्तीमध्ये फोटोसहित प्रसिद्ध करण्यात यावेत ही नम्र विनंती*

आपला

निलेश खरात

प्रदेश अध्यक्ष

9822418395

 

सचिन मेंगाळे

प्रदेश सरचिटणीस

9422037029

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

(संलग्न : भारतीय मजदूर संघ)

mvkksangh@gmail.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments