Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedआचारसंहितेमुळे म्हाडाच्या सदनिका वितरण प्रक्रियेला स्थगिती* *सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात...

आचारसंहितेमुळे म्हाडाच्या सदनिका वितरण प्रक्रियेला स्थगिती* *सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार*

 

 

पुणे, दि. २६ : जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाअंतर्गत २८ मे रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे

यापूर्वी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाअंतर्गत कार्यरत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पीएमआरडीए क्षेत्रातील २० टक्के सर्वसमावेशक व १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत विक्री अभावी रिक्त असलेल्या सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळातच्यावतीने देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments