Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाणुसकीचे दर्शन ! रस्त्यात सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र महिलेला केले परत

माणुसकीचे दर्शन ! रस्त्यात सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र महिलेला केले परत

आजच्या युगात जिथे प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला आहे, तिथेच एका सुजाण नागरिकाच्या प्रामाणिकपणामुळे आणि ‘एस हॉस्पिटल ‘एरंडवणे येथील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे एका महिलेचे हरवलेले लाखो रुपयांचा दागिना तिला सुखरूप परत मिळालाआहे. रस्त्यात सापडलेले अंदाजे १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र संबंधित महिलेला परत करून समाजात अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय आणून दिला आहे.

 

मागील आठवड्यात एस हॉस्पिटलच्या बाहेरील रस्त्यावर एका महिला रूग्णाचे अंदाजे १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हरवले होते. यानंतर या महिलेने हॉस्पिटलमध्ये येऊन कर्मचाऱ्यांना याबद्दल सांगितले. हॉस्पिटल स्टाफने वेळ न दवडता त्या दिवशी तिथे आलेले रुग्ण, नातेवाईक आणि व्हिजिटर्स यांच्याकडे चौकशी सुरू केली.

 

दरम्यान, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये व्हिजिटसाठी आलेले मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह श्री.गणेश वाघमारे यांना रस्त्याने येताना हे मंगळसूत्र सापडले होते. हॉस्पिटलमध्ये याबाबत चौकशी सुरू असल्याचे त्यांना त्यांचे मित्र अजय कापसे यांचेकडून समजताच, त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला फोन करून दागिना आपल्याकडे सुरक्षित असल्याचे कळवले.

 

यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने संबंधित महिला रुग्णाच्या पतीला बोलावून घेतले आणि सर्वांसमक्ष सोन्याचे मंगळसूत्र त्यांना सुखरूप परत केले.

 

सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

 

आजच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना, रस्त्यात सापडलेले लाखो रुपयांचे मंगळसूत्र स्वतःहून परत करणाऱ्या श्री. वाघमारे यांच्या प्रामाणिकपणाचे आणि रुग्णाप्रती दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल ‘एस हॉस्पिटल’च्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून कौतुक

होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments